Leg care: Best tips to take care of your feet Canva/Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Leg care tips: पायांची काळजी घेण्यासाठी करा 'हे' उपाय

पावसाळी हवामानात आपल्या पायांची काळजी कशी घ्यावी, याची नेमकी माहिती वैद्य कृपा नाईक यांच्या लेेखनीतून

Sanjay Ghugretkar

पावसाळ्यात (Monsoon) पयांची विशेष निगा राखली पाहिजे (Leg care). नीट काळजी घेतली नाही तर पुढील तक्रारी उद्‍भवू शकतात. तळपाय - टाच दुखणे, पोटऱ्या दुखणे पायांना भेगा पडणे, नखांचे विकार, पाय सुजणे, पायांना खाज येणे, (heel pain), (abdominal pain) पायाच्या बोटांमधील जागेत त्वचा रोग होणे इ. पावसाळ्यात तर हे विकार बळावताना दिसतात.

आपल्या या शरीररूपी यंत्राचं ओझं दिवसभर वहाण्याचं काम आपले दोन्ही पाय (legs) करत असतात. पाच कर्मेंद्रियांपैकी 'पाद' म्हणजेच पाय हे एक कर्मेंद्रिय आहे. त्यामुळे पायांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. (Leg care: Best tips to take care of your feet)

पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी ?


1) पावसाच्या पाण्यात पाय भिजले असता, पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करावे.

2) हवेशीर पादत्राणे (चप्पल, सँडल्स) वापरावी. शक्यतो बंद शूज, मोजे घालणे टाळावे.

3) बाहेर अनवाणी फिरू नये. कारण चिखलापासून विविध त्वचा विकार होण्याची शक्यता असते.

4) खूप वेळ पाय ओले रहाणार नाही अशी काळजी घ्या.

5) कडुनिंब, निगडी, पारिजातक यांची पाने साधारण २ पसे किंवा त्रिफळा चूर्ण 1 मोठा चमचा पाण्यात उकळवून तयार झालेल्या, सहन होईल एवढ्या गरम काढ्यामध्ये पाय 10-15 मि. बुडवून ठेवा. असे किमान आठवड्यातून एकदा करावे.

6) उटणे वापरून पाय स्वच्छ करावे.

आयुर्वेदानुसार पाय हे वातदोषाचे एक स्थान आहे. त्यामुळे जर पायांची नीट काळजी घेतली नाही व अतिरिक्त ताण जसे की खूप वेळ उभे राहणे, दीर्घकाळ चालणे, जास्त प्रमाणात कोरडा आहार (बेकारीचे पदार्थ, बेसन, वाटणे, तेल-तूप विरहित पदार्थ) खाणे असे सुरू ठेवल्यास या वातदोषाचा प्रकोप होऊन रोगनिर्मिती होऊ शकते.

म्हणूनच या वात दोषाला नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदात प्रतिबंधक उपाय म्हणून पादाभ्यंग नित्य करण्यास सांगितले आहे. पादाभ्यंग म्हणजे दोन्ही पायांना गुडघ्यापासून तळपायापर्यंत तेल मालिश करून तेल जिरवणे. यासाठी उन्हाळ्यात खोबरेल तेल , पावसाळ्यात व हिवाळ्यात तीळ तेल कोमट करून वापरावे. पादाभ्यंग उपाशीपोटी, जेवणानंतर 3 तासांनी किंवा विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी करावे.

पादाभ्यंगाचे फायदे
1) पायांची त्वचा सुकुमार व निरोगी होते.
2) वातदोषाचे शमन होते त्यामुळे टाच दुखी, तळपाय, पोटऱ्या दुखणे यापासून आराम मिळतो.
3) पायांचा थकवा नाहीसा होतो.
4) डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.
5) चांगली , शांत झोप लागते. मानसिक ताण हलका होतो.
6) पायांची त्वचा स्निग्ध होते त्यामुळे पायांना सुरकुत्या किंवा भेगा पडत नाहीत.

पादाभ्यंग कोणी करू नये?
ताप, सर्दी, अजीर्ण, पायांना सूज, जखम, पायाचे त्वचारोग, रक्ताभिसरणाशी निगडीत व्याधी असेल्यांनी तसेच पायांना आघात झाल्यास पादाभ्यंग करू नये. तसेच जेवणानंतर लगेच पादाभ्यंग करू नये. ज्यांना आरोग्य विषयक काहि तक्रारी असतील त्यांनी जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच पादाभ्यंग सुरू करावे.

टीप
दिवसा पादाभ्यंग केल्यास साधारण 2 तसानंतर तळ पायांचे तेल पुसून घेणे व वर सांगितलेल्या काढ्यात पाय 10-15 मि. शेकून , आवश्यक असल्यास उटणे वापरून पाय धुवावे व पुसावे. अशा प्रकारे आपल्या पायांची काळजी घेतल्यास पायांच्या विविध रोगांपासून रक्षण होईल. पावसाळ्याचा आनंद ही घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT