High Blood Pressure Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये करा 'या' पदार्थाचा समावेश

दुधी भोपळा खाल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामुळे याचा आहारात समावेस करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

High Blood Pressure: दुधी भोपळा अनेक लोकांना खायला आवडत नाही. पण दुधी भोपळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे अनेक आजार दूर राहतात. तसेच हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी दुधी भोपळ्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. तज्ञांच्या मते दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने हृदयविकार आणि स्टोकसारखे आजार दूर राहतात.

  • कॉलेस्ट्रॉल नियंणात राहते

दुधी भोपळा फायबरचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि पचन संस्था सुरळित कार्य करते. याचे सेवन केल्याने शरीरामध्ये खराब कोलेस्टॉल जमा होत नाही. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत करते.

  • पोटॅशियम भरपूर प्रमाणात

दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. जे रक्तवाहिन्या उघडण्यास आणि योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. तसेच रक्ताचा वेग योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. यामुळे हृदयावर कोणताही ताण येत नाही आणि हाय ब्लड प्रेशरच्या समस्या दूर राहतात.

  • पाण्याचे भरपुर प्रमाण

दुधी भोपळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. यामुळे नसा निरोगी राहून रक्ताभिसरण सुधारते. हृदयावरचा ताण कमी करण्यासाठी आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. जे लोक दुधी भोपळ्याचे नियमितपणे सेवन करतात अशा समस्यांपासून दूर राहतात.

  • केस गळती कमी

दुधी भोपळा आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याचा रस काढून त्यात तिळाचे किंवा कोबऱ्याचे तेल मिक्स करावे. झोपतांना या तेलाने मसाज करावी. यामुळे केस मजबुत होतात आणि केसगळतीची समस्या कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT