Health Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: सावधान! पाण्याच्या कमतरतेमुळे 'या' त्रासाला जावे लागु शकते सामोरे...

रात्री झोपतानाही तुम्हाला थंडी वाजते, तर वाचा काय म्हणते संशोधन

दैनिक गोमन्तक

तुम्ही घरी किंवा कामाच्या ठिकाणी फ्रेश फिलिंग करत नसाल तर त्यामागे काय कारण असू शकते? नेहमी थकवा जाणवतो आणि काम करावंसं वाटत नाही, पण तुमची जीवनशैली पूर्णपणे बिघडली की असं होतं असं डॉक्टर मानतात. तुम्ही तुमचा आहार नीट पाळत नाही आणि तुमची झोपही नीट होत नाही. अशा स्थितीत शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.

(Lack of water can lead to many problems)

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी पाणी प्या

वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा सर्वात आधी तुमचा फोन, लॅपटॉप, टीव्ही स्वतःपासून दूर ठेवा कारण एकदा तुम्ही फोन उघडला आणि स्क्रोल करायला सुरुवात केली की तुमची झोप पळून जाईल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकूनही रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिऊ नये. आता प्रश्न असा आहे की काय करावे? यावर डॉक्टर म्हणतात, 'रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे.' थंड किंवा गरम पाणी प्यावे का असा प्रश्न पडतो. वास्तविक, अनेक डॉक्टर म्हणतात की पाणी प्यायल्याने चांगली झोप लागते. रात्री पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला चांगली झोप येत असेल तर ते तुमच्या त्वचेसाठी, पोटासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

शरीराचे तापमान नियंत्रित करते

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे हे औषध मानले जाते. डॉक्टर म्हणतात, 'झोपण्यापूर्वी रूम टेंपरेचरनुसार पाणी प्यायल्यास सकाळी तुमची त्वचा चमकत असल्याचे दिसेल. एवढेच नाही तर पोटही स्वच्छ राहते आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी आणि फ्रेश वाटेल.

संशोधन काय सांगते

अभिनव गुप्ता, सल्लागार, मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मते, झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. ज्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहता. संशोधनानुसार, डिहायड्रेशनमुळे अनेकांना झोपताना खूप गरम किंवा थंडी जाणवते. झोपण्यापूर्वी भरपूर पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान सामान्य राहते. तुम्हाला थंड किंवा गरम जाणवणार नाही. त्याचा फायदा असा आहे की झोपताना तुम्ही हायड्रेटेड राहता. 2014 मध्ये 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पाण्याची कमतरता हे मूड स्विंगचे एक प्रमुख कारण असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT