Green Leafy Ranbhaji Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Leafy Wild Vegetables: पावसाळ्यात मिळणारी चविष्ठ रानभाजी तुम्ही खाल्ली का?

Green Leafy Ranbhaji: अनेक औषधी गुणांनी युक्त अशी ही रानभाजी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Green Leafy Wild Vegetables: आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपला आहार योग्य असणे गरजेचे असते. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन, इतर खनिजे मिळाणे गरजेचे असते.

अनेकवेळा असंतुलित आहारामुळे सातत्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे आपण पाहतो.

अशावेळी त्या-त्या ऋतुनुसार आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या, बाजारात मिळणाऱ्या आणि आपल्या शेतात मिळणाऱ्या रानभाज्यांचे सेवन करणे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे ठरते.

आज अशाच एका रानभाजीच्या फायद्याबद्दल जाणून घेणार आहोत. ही भाजी म्हणजे कुर्डूची भाजी आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला कुर्डूची भाजी शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन, जंगल अशा ठिकाणी आपोआप उगवून येते.

कुर्डुची रानभाजी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. माठ वर्गात मोडणारी ही अतिशय चविष्ठ व अनेक औषधी गुणांनी युक्त अशी ही रानभाजी आहे.

ही रानभाजी कोवळी असताना खाल्ली तर ती अधिक चवदार आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात. खुडून आणलेली कुर्डूची भाजी धुवून चिरतात.

माठाच्या भाजीप्रमाणेच ही कुर्डूची भाजी शिजवतात. पातळ व सुकी अशा दोन्ही पद्धतीने शिजवलेली कुर्डूची भाजी चवदार असते.

पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पुढचे तीन महिने ही रानभाजी मोठ्या प्रमाणात आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध असते. जे शहरात राहतात त्यांना ही भाजी बाजारातदेखील मिळू शकते. .

Kurduchi Bhaji

साधारण सप्टेंबर महिन्यात अशा वाढलेल्या कुर्डूला फुलांचे रंगीत तुरे येतात. ही फुले परिपक्व होऊन सुकल्यावर अगदी माठासारख्याच काळ्या बिया तयार होतात.

फुले सुकून गेली की या बिया पडून सर्वत्र पसरतात.

याच बिया पावसाळ्याच्या सुरुवातीस उगवतात. कुर्डुच्या काळ्या बिया मूतखड्याच्या आजारावरही अतिशय गुणकारी आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात अशा कुर्डुची भाजी तीन चार वेळेस खाल्ली तरी आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ही भाजी करण्यासदेखील सोपी आहे.

  • अशी करा कुर्डूची भाजी

सुरुवातीला भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालून परतून घ्यावे. टोमॅटो आणि कुर्डूची चिरलेली भाजी टाकावी त्यात टाकावी. थोड्या वेळ भाजी शिजल्यानंतर त्यात मिठ घालावे.

त्यानंतर 3-4 मिनीटांनी ओल खोबर घालावे व गॅस बंद करावा. जर तुम्हाला आवडत आणखी वेगळी चव हवी असेल तर भिजवलेली चणाडाळ किंवा मुगडाळ घालुनही ही भाजी करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT