Korean Hair Care Routine Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Korean Hair Care Routine: घनदाट केसांसाठी फॉलो करा कोरियन टिप्स

कोरियन महिलांसारखे चमकदार केस हवे असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Korean Hair Care Routine: प्रत्येक महिलेला केस घनदाट आणि चमकदार असावे असे वाटते. यासाठी महिला अनेक उपाय करतात. पण सध्या कोरियन पद्धतीची जास्त क्रेझ आहे. कोरियन मुलींचे केस जास्त घनदाट आणि चमकदार असतात. तुम्हालाही त्यांच्या सारखे केस हवे असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप ग्रीन टी पाणी

1 कप कांद्याचा रस

1 चमचे मध

1 टीस्पून लिंबाचा रस

  • हेअर मास्क बनवण्याची पद्धत

एक कप पाणी उकळावे आणि नंतर त्यात ग्रीन टी बॅग घालावे. 10 मिनिटे टी बॅग पाण्यात ठेवावी. नंतर काढून टाकावी. नंतर पाणी थंड होऊ द्यावे.यानंतर एक मोठा कांदा घ्यावा आणि नंतर सोलून त्याचा रस काढावा. यासाठी तुम्ही कांदा किसून मिक्सरमध्ये बारीक करून नंतर गाळून ज्यूस बनवून ग्रीन टीच्या पाण्यात मिक्स करावे. यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करावा आणि नंतर हे मिश्रण केसांना लावावे. केसांच्या मुळात लावावे. केसांची लांबी पाहून मिश्रण तयार करावे. म्हणजे केस जास्त लांब असेल तर जास्त आणि केस लहान असेल तर कमी बनवावे. 30 ते 45 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. केस नैसर्गिकरित्या कोरडे करावेयानंतर तुम्हाला कोरियन हेअर सीरम लावावे लागेल, तुम्ही हे घरीही बनवू शकता.

  • कोरियन हेअर सीरम कसा बनवायचा

कोरियन हेअर सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 टेबलस्पून एलोवेरा जेल

1 टेबलस्पून लिंबाचा रस

1 टेबलस्पून गुलाबजल

  • कोरियन हेअर सीरम बनवण्याची पद्धत

कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिक्स करावे. नंतर हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून ठेवावे. मग तुम्ही ते केसांमध्ये स्प्रे करा आणि ते सोडा. तुमच्या केसांना दिवसभर एक अनोखी चमक असेल. दिवसातून दोनदा हे हेअर सीरम तुमच्या केसांवर नियमितपणे लावा आणि तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम मिळतील.

  • या गोष्टी लक्षात ठेवा

या हेअर केअर रूटीननंतर तुम्हाला तुमच्या केसांवर कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरण जसे की स्ट्रेटनर, ड्रायरचा वापर करू नका.

हेअर केअर रूटीननंतर लगेच घराबाहेर पडू नका.

विशेषतः उन्हात बाहेर पडू नका.

ज्या दिवशी तुम्हाला बाहेर जावे लागणार नाही तेव्हा ही ट्रीटमेंट करू शकता.

जर तुम्ही तुमच्या केसांना ही ट्रीटमेंट देत असाल तर केसांना मेंदी लावू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT