know right way to eat raisins raisins increase strength of mens health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मनुके पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या अद्भुत फायदे

विवाहित पुरुषांसाठी मनुका फायदेशीर

दैनिक गोमन्तक

मनुके जितके गोड खावेत तितके त्याचे गुणधर्म जास्त असतात. थकवा दूर करण्यापासून ते अनेक आजारांवर आराम देण्यापर्यंत त्याचा उपयोग होतो. जर तुम्ही शारीरिक दुर्बलतेचे शिकार असाल तर मनुके खा, शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडेही मजबूत होतात. मनुका पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

मनुक्या मध्ये पोषक तत्वे आढळतात

मनुक्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन-बी6 आणि मॅंगनीज तसेच अनेक आवश्यक पोषक घटक असतात. मनुक्यामध्ये आढळणारे हे सर्व आवश्यक पोषक तत्व आपल्या शरीराला आवश्यक असतात.

आयुर्वेद तज्ञ काय म्हणतात?

मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर आढळतात. तुम्ही रोज 10 ते 12 मनुके खाऊ शकता. यामध्ये आढळणारे सर्व घटक निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मनुका पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर मात करण्यास मदत करतात.

मनुका चे आश्चर्यकारक फायदे

मनुक्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम (Calcium) आणि पोटॅशियम आढळतात, जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करतात.

भिजवलेले मनुके वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहेत. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

कॅल्शियममुळे आपली हाडे आणि दात दोन्ही निरोगी राहतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अर्धा कप मनुक्यामध्ये 45 मिलीग्राम कॅल्शियम असते. हे तुमच्या दैनंदिन कॅल्शियमच्या 4 टक्के इतके आहे.

ज्या लोकांना शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या असते. त्यांनी मनुका आणि मधाचे सेवन करावे. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. मनुक्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात. हे तुमच्या दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.

मनुका खाण्याची योग्य पद्धत

मनुका भिजवून खावे, कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटकांचे प्रमाण वाढते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे तुम्ही आजारांपासूनही वाचाल आणि दिवसभर तुमचा उत्साहही राहील.

विवाहित पुरुषांसाठी मनुका फायदेशीर

दुधासोबत (milk) मनुका खाणे विवाहित पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यांनी सांगितले की, एका संशोधनानुसार, मनुक्यामध्ये पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्याचा गुणधर्म आहे. शुक्राणूंची गतिशीलता वाढवण्याची क्रिया देखील मनुकामध्ये सक्रियपणे आढळते. त्यामुळे दुधासोबत मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT