Grading Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: विंडो गार्डनिंग करताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात

ज्या लोकांना बागकाम करायला आवडते ते लोक सहसा खिजकीजवळ सुंदर रोप लावतात.

Puja Bonkile

Gardening Tips: अनेक लोक आपल्या घरातील बागकाम करतात. विशेषत: शहरी भागात लोक त्यांच्या घराचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी इनडोअर गार्डनिंग करतात. घरातील बागकाम करताना, लोक वेगवेगळ्या ठिकाणी रोपे ठेवतात.

इनडोअर गार्डनिंगमध्ये, खिडकीत किंवा खिडकीजवळ झाडे ठेवणे खूप सामान्य आहे. जेव्हा तुम्ही विंडो गार्डनिंग करता तेव्हा झाडांना सूर्यप्रकाशही मिळतो आणि त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. अशी अनेक झाडे आहेत जी खिडकीजवळ ठेवणे चांगले मानले जाते. मात्र, विंडो गार्डनिंग करताना काही छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

पुरेसे पाणी द्यावे

जेव्हा तुम्ही विंडो गार्डनिंग कराल तेव्हा रोपांना पाण्याची किती गरज आहे हे लक्षात घ्यावे. झाडाला पाणी देण्यापूर्वी भांड्याच्या मातीतील आर्द्रता नेहमी तपासावी. कधीकधी पावसाळ्याच्या दिवसात झाडाला पुरेसे पाणी मिळते, त्यामुळे जेव्हा माती कोरडी असेल तेव्हाच झाडांना पाणी द्यावे. जर तुम्ही जास्त पाणी दिले तर तुमच्या झाडांना जास्त पाणी दिल्याने नुकसान होऊ शकते.

कोणती रोप लावावी

विंडो गार्डनिंग करताना जागा ही सर्वात मोठी समस्या असल्याने, जेव्हा तुम्ही विंडो गार्डनिंग कराल तेव्हा योग्य रोपं लावावी. उभ्या जागा घेणाऱ्या वनस्पतींची निवड करावी. जसे की वेली लावू शकता किंवा हँगिंग बास्केट किंवा विंडो बॉक्सचा वापर करू शकता.

वॉटर ड्रेनेजकडे लक्ष द्यावे

जेव्हा तुम्ही विंडो गार्डनिंग करत असाल तेव्हा पाण्याच्या ड्रेनेजकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पाणी साचणे आणि मुळांच्या सडण्याच्या समस्या टाळण्यासाठी तुमच्या कंटेनरमध्ये ड्रेनेज होल असले पाहिजे. शक्य असल्यास, पाण्याचा निचरा होण्यासाठी कंटेनरच्या तळाशी खडे टाकू शकता.

विंडो गार्डनिंग योग्य

तुमच्या घरात अनेक ठिकाणी खिडक्या असतील, पण जेव्हा तुम्ही विंडो गार्डनिंग करत असाल तेव्हा तुम्ही योग्य जागा निवडावी. रोपे खिडकीवर ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. जेव्हा तुमच्या झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो तेव्हा त्याचा त्यांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT