Tips For Happy Married Life: नवरा बायकोचे नातं हे विश्वासावर टिकुन असतं. नातं मजूबत राहण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करत असतो. यासोबतच नातं सकारात्मक असणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे.
सध्या धावपळीच्या जीवनात कितीतरी गोष्टींचा प्रभाव नात्यावर पडत असतो. अनेक वेळा पार्टनरला पाहिजे तसा वेळ देता येत नाही.
यातूनच त्यांच्यात वाद होतात आणि नात्यात एक प्रकारची कटुता येते. नात्यात आनंद आणि सकारात्मकता ठेवण्यासाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता.
सवय बनवा
रिलेशनशिपला सकारात्मक आणि मजबूत करण्यासाठी काही गोष्टींची सवय लावून घेणे गरजेचे आहे. जसे जेव्हा पण तुम्ही कामावर जात असाल किंवा काही कामानिमित्त बाहेर जात असाल तेव्हा आपल्या पार्टनरला मिठी मारावी किंवा किस करावे.
आठवड्यात एकदा कोणताही गेम किंवा आपल्या बेडरुममध्ये सोबत नाश्ता करावा. अशा काही सवयी फिक्स करा आणि त्यांची प्रॅक्टिस करा. या सर्व सवयी तुमचे आयुष्य आनंदी ठेवण्यास मदत करेल.
संवाद साधावा
आपल्या पार्टनर सोबत संवाद साधणे खुप गरजेचे असते. तुमचे रिलेशन स्ट्राँग करण्यासाठी तुम्हाला अनेकांनी हा सल्ला दिला असेल. तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणांमध्ये तुम्हाला कसे वाटते याबद्दल चर्चा करावी.
कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याबद्दल बोलावे. नात्यात संवाद साधल्याने नातं आणखी मजबूत होते.
फ्लेक्सिबल रहा
तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना किती ओळखता हे आवश्यक नाही. पण तरीही असे होऊ शकते की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकत नाही.
जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा बोलणे आवडत नसेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी स्पष्ट बोलावे. नात्यात फ्लेक्सिबिलीटी असणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये तणाव आल्यास ते तुटण्याची शक्यता असते.
एकमेकांना स्पेस द्यावे
जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याची स्पेस देत असाल तर याने तुमचे नाते आणखी मजबूत होते. प्रत्येकाचे स्वतःचे असे एक आयुष्य असते, ज्यामध्ये प्रत्येक वेळी फक्त तुम्हीच असावे हे गरजेचे नाही. तुमच्या पार्टनरला त्यांच्या मित्रांसोबत (Friend) वेळ घालवण्यासाठी स्पेस द्या.
एडजस्ट करा
तुमचा पार्टनर जसा आहे तसाच त्याला एक्सेप्ट करा. अनेक वेळा काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. त्यामुळे वेळोवेळो एडजस्ट करणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.