Summer Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात AC अन् Cooler शिवाय ठेवा घर थंड

तुम्हालाही तुमचे घर जर AC शिवाय थंड ठेवायचे आहे तर या टिप्स नक्की फॉलो करा.

दैनिक गोमन्तक

प्रत्येकालाच उन्हाळ्यामध्ये घर थंड राहावे असे वाटते. पण त्यासाठी एसी आणि कूलर हवाच असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही एसी आणि कुलरशिवायही घर थंड ठेवू शकता.

* घराच्या बाल्कनीमध्ये रोपे लावा

तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये जितकी जास्त झाडे लावाल तितकी घर थंड राहू शकते. झाडांच्या च्या मदतीने उष्णता बर्‍याच प्रमाणात कमी करता येते. तसेच तुम्ही खोलीच्या आत इनडोअर रोपे सुद्धा लावू शकता.

* छतावर पाणी घाला

घराच्या (Home) छतावर सायंकाळनंतर पाणी टाकल्यास घरामध्ये थंडावा जाणवतो. फॅन चालवल्यास गरम हवेएवजी थंड हवा येईल. घरच्या छतावर पाणी टाकल्यास छताची उष्णता कमी होते.

* स्टँड फॅन वापरावा

रात्री झोपताना तुम्ही टेबल फॅन किंवा स्टँड फॅन वापर करू शकता. टेबल फॅनसमोर बर्फाची वाटीही ठेवू शकता यामुळे पंखा चालू असताना थंड हवा देतो.

* क्रॉस-व्हेंटिलेशन आवश्यक

क्रॉस-व्हेंटिलेशन घरात असणे आवश्यक आहे.हे एक घर थंड ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. खोलीतील गरम हवा निघून जाऊन घरात थंडावा जाणवतो.

* घरासमोर ग्रीन नेट लावावी

घरातील खिड्यांमध्ये किंवा दारासमोर ग्रीन नेट लावल्यास सूर्यप्रकाश थेट घरात येणार नाही. घर जास्त तापणार नाही. यामुळे एसी नसला तरी तुमचे घर थंड राहणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT