Jam Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jam: जाम फक्त ब्रेडवरच नाही तर 'अशा' प्रकारे खाऊ शकता

Jam: अनेक लोकांना नाश्त्यात ब्रेडसोबत जाम खायला आवडते. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाम वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता आणि तुमच्या चवीमध्ये ट्विस्ट आणू शकता.

Puja Bonkile

jam eat different ways try home

अनेक लोकांना नाश्त्यात ब्रेडसोबत जाम खायला आवडते. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाम वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता आणि तुमच्या चवीमध्ये ट्विस्ट आणू शकता.

बाजारात अनेक वेगवेगळ्या चवींचे जाम मिळतात. जे प्रत्येक वेळी तुमच्या चवीला नवीन चव देतात. मग आता खाण्याची पद्धत का बदलू नये. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण जाम हा एक बहुमुखी आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, जो सकाळी नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणापर्यंत खाऊ शकता.

सॅलड

जेव्हा आपण सॅलड ड्रेसिंग थोडे गोड बनवतो तेव्हा आपण त्यात थोडी साखर किंवा मध घालतो. पण आता तुम्ही त्याऐवजी काही जाम वापरू शकता. तयार सॅलड ड्रेसिंगमध्ये तुमच्या भाज्या घाला आणि मिक्स करा. खायला खूप चविष्ट होईल.

दही

तुम्ही दह्यामध्ये जाम मिक्स करून खाल्ले आहे का? नाही तर नक्की खावून पाहा. जर तुम्हाला तुमच्या साध्या दह्याला फळांची चव द्यायची असेल तर त्यात तुमचा आवडता जाम मिक्स करू शकता. एक कप दह्यामध्ये जॅम घातल्यास त्याची चव अनेक पटींनी वाढते. जर तुमची मुले दही खात नसतील तर त्यांना असे खायला द्या. त्यांना दही खायला नक्कीच आवडू लागेल.

कॉकटेल

तुम्ही कॉकटेलमध्ये जाम देखील वापरू शकता. यामुले याची चव द्विगुणित होते. तुम्ही जाम वापरून अनेक कॉकटेल बनवू शकता जसे की जॅम मोजिटो, जॅम मार्गारीटा, जॅम स्प्रित्झ इ. कॉकटेल सर्व्ह करण्यापूर्वी ते चांगले मिक्स करावे.

चपाती

चपातीला जाम लावून देखी खाऊ शकता. भाजी खायची इच्छा नसेल तर तुम्ही जाम लावून खाऊ शकता. यामुळे साधी चपाती देखील स्वादिष्ट वाटेल.

मफिन्स

मुलांना मफिन्स खायला आवडतात. त्याची चव आणखी चांगली करण्यासाठी तुम्ही जाम वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमचा आवडता मफिन बॅटर बनवायचा आहे आणि प्रत्येक मफिन कप अर्धा भरायचा आहे. मध्यभागी एक चमचा जाम घाला, नंतर बेकिंग करण्यापूर्वी अधिक पिठाने झाकून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही स्वादिष्ट जाम भरलेले मफिन्स तयार करू शकता.

पॅनकेक्स

अनेकदा लोक सुट्टीच्या दिवशी पॅनकेक्सचा आस्वाद घेतात. पॅनकेक्स आणखी चवदार बनवण्यासाठी काही चिरलेली फळे, मॅपल सिरप किंवा मध इत्यादी वापरतो. परंतु तुम्ही पॅनकेक्सवर आपले आवडते जाम देखील टाकून खावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT