निर्माल्य कलश
निर्माल्य कलश Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पर्यावरणाचीही काळजी घ्या

दैनिक गोमन्तक

आपले सर्व सण-उत्सव हे पर्यावरण (Environment) रक्षणासाठीच असतात. त्यामुळे कोणताही सण साजरा करताना प्रदूषण होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशपूजन करण्यास सांगण्यात आलं आहे. गणेशमूर्ती (Ganesha idol) ही मातीचीच हवी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असतं. त्यामुळं पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मातीच्या गणेशमूर्तीचं पूजन करण्यास सांगण्यात आलं आहे. पूर्वी लोकसंख्या कमी होती. त्यावेळी गणेशमूर्तींची संख्याही कमी होती, सध्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच गणेश उपासकांची संख्याही वाढली आहे. गणेशमूर्तींची संख्या वाढल्यानं पर्यावरणाचा (Environment) प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचं विसर्जन करून जलप्रदूषण टाळणं गरजेचं आहे. निर्माल्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. निर्माल्यावर पाणी शिंपडलं, की त्याचं विसर्जन होतं. मग ते निर्माल्य खत करण्यासाठी निर्माल्य कलशात ठेवावं. कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य पाण्यात टाकू नये. जलप्रदूषण (Water pollution) होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. गणेशोत्सवात ध्वनिवर्धकाचा वापर हा संयमाने करावा. गणेशपूजनानंतर म्हणायची आरती मधुर आवाजात म्हणावी. गणेशोत्सवामुळं ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. सध्या बाजारात मिळणारा कापूर व अगरबत्त्या या केमिकलपासून (Chemical) बनविलेल्या असतात. त्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनविकार उद्भवतात. वायूप्रदूषण (Air pollution) होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. आपण आनंद घेत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी.

सध्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगामुळं अनेक भारतीय लोक परदेशांत स्थायिक झाले आहेत. जगाच्या प्रत्येक देशात भारतीय लोक गेले आहेत. तिथंही ते गणेशोत्सवासारखे सण साजरे करत आहेत. त्यामुळं भारताचा पारंपरिक गणेशोत्सव आता ‘ग्लोबल’ झाला आहे. परदेशांतले नागरिकही भारताचा गणेशोत्सव सोहळा पाहायला आणि त्यात सहभागी होण्यासाठी भारतात येत असतात. अनेक धर्मांचे लोकही या उत्सवात सहभागी होत असतात. म्हणून या पारंपरिक गणेशोत्सवाला देखणं, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक स्वरूप येणं आवश्‍यक आहे आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे.

स्वातंत्र्य चळवळीत स्वराज्यप्राप्तीसाठी, जनजागृतीसाठी उपयोग झालेल्या या गणेशोत्सवाला आता मात्र आरोग्य, देशप्रेम, लोकशिक्षण, स्वच्छता प्रबोधन, निसर्गरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करून घ्यायला हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT