Wine Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Wine Study Report: वाइनमुळे हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका कमी होतो? नव्या संशोधनात समोर आली महत्वाची माहिती

Wine And Health : आठवड्यातून एक ग्लास ते दररोज अर्धा ग्लास घेत असेल तर त्याला हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका ३८ टक्क्यांनी कमी झाला, असे संशोधनात आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दररोज एक ग्लास वाइन पिल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो, असे बार्सिलोना विद्यापीठाच्या संशोधनातून दिसून आले आहे. एका स्पॅनिश संशोधनात हृदयविकाराचा धोका जास्त असलेल्या आणि मेडिटेरियन डाइटचे पालन करणाऱ्या लोकांवर मद्य सेवनाच्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला.

मेडिटेरियन डाइट हा वनस्पती-आधारित आहार आहे, जो आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. यामध्ये फळे आणि भाज्या अधिक खाल्ल्या जातात आणि दुधाचे पदार्थ, अंडी, मांस किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले जातात. या आहारात साखर किंवा मीठ देखील मर्यादित प्रमाणात वापरले जाते.

जे लोक दररोज अर्धा ते एक ग्लास रेड वाईन पितात त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारख्या गंभीर हृदयविकाराच्या समस्या होण्याची शक्यता ज्यांनी खूप कमी वाइन प्यायली आणि अजिबात प्यायली नाही याच्या तुलनेत 50 ने कमी असते. तसेच, अल्कोहोलचे प्रमाण कमी ठेऊन, कोणी आठवड्यातून एक ग्लास ते दररोज अर्धा ग्लास घेत असेल तर त्याला हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका ३८ टक्क्यांनी कमी झाला, असे संशोधनात आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधनात काय आढळले?

१) बार्सिलोना युनिव्हर्सिटीचे रिसर्च लीडर प्रोफेसर रेमन ॲस्ट्रुक म्हणाले, 'इतर संशोधनाच्या तुलनेत आम्हाला अल्कोहोलचे अधिक सकारात्मक परिणाम आढळले आहेत. आम्हाला जोखीम मध्ये 50 टक्के कपात झाल्याचे आढळले.

२) संशोधनात सहभागी सुमारे 1232 सहभागी मेडिटेरियन डाइट घेत होते आणि त्यांना टाइप 2 मधुमेह, धूम्रपान किंवा उच्च कोलेस्ट्रॉल होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. सहभागींना त्यांच्या आहाराबद्दल विचारण्यात आले आणि त्यांची लघवीची चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये टार्टेरिक ऍसिडची पातळी तपासण्यात आली.

३) हे रसायन नैसर्गिकरित्या द्राक्षे आणि वाइन सारख्या द्राक्ष उत्पादनांमध्ये आढळते आणि मूत्रमार्गे उत्सर्जित होते. दरम्यान, संशोधनात सहभागी नसलेल्या तज्ञांनी जास्त प्रमाणात मद्यपान करणे हानिकारक असू शकते, असा इशारा दिला.

४) कमी किंवा मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, परंतु रेड वाईनची बाटली पिणे हेच सर्व काही नाही, असे ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या वरिष्ठ आहार तज्ञ ट्रेसी पार्कर म्हणाल्या.

५) दरम्यान, ही बाब लक्षात घ्यायला हवी की रेड वाइन आणि हृदयाच्या समस्यांमधील संबंध दिसून येतो पण, पूर्णपणे सत्यापित करत नाही. यासाठी अजून संशोधनाची गरज आहे. जास्त मद्यपान केल्याने हृदय आणि रक्त परिसंचरण संबंधित समस्या जसे उच्च रक्तदाब, यकृत समस्या आणि काही प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT