Cockroach Milk: झुरळाचे दूध सुपरफूड असण्याच्या कल्पनेने उत्सुकता आणि वादविवाद निर्माण केले आहेत. संशोधकांना असे आढळून आले की, झुरळाचे दूध गाय किंवा म्हशीच्या दूधापेक्षा जास्त आरोग्यदायी आणि पोषक तत्वांनी भरलेले आहे. दरम्यान, यावर सध्या लोक तर्क-वितर्क लढवू लागले आहेत. चला तर मग झुरळाचे दूध खरोखरच मानवांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर आहे का? ते जाणून घेऊया...
झुरळाचे दूध हे प्रथिनांनी समृद्ध असलेले क्रिस्टलाइनसारखे पदार्थ आहे, जे डिप्लोप्टेरा पंक्टाटा (Diploptera Punctata) या विशिष्ट झुरळ प्रजातीद्वारे तयार केले जाते. ही प्रजाती इतर झुरळांच्या प्रजातीपेक्षा वेगळी आहे, कारण ती अंडी देण्याऐवजी जिवंत पिल्लांना जन्म देते. मादी झुरळ तिच्या गर्भाचे पोषण करण्यासाठी दुधासारखे पदार्थ तयार करते, ज्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट आणि आवश्यक अमीनो आम्ल असतात.
संशोधकांच्या मते, झुरळाचे दूध गाय, म्हशी आणि अगदी मानवी दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असू शकते. प्रयोगशाळेतील अभ्यासात असे आढळून आले की, त्यात गाईच्या दुधापेक्षा तीन पट जास्त पोषक घटक असतात. त्यात सुमारे 45 टक्के प्रथिने, 25 टक्के कर्बोदके आणि 16-22 टक्के फॅट तसेच ओमेगा-3 फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दुसरीकडे मात्र गाईचे दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सारख्या पोषक तत्वांचा स्रोत आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी ते एक प्रमुख आहार आहे.
झुरळाच्या दूधाला सुपरफूड म्हणून प्रचारित केले जात असले तरी, ते मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही. एक ग्लास झुरळाचे दूध मिळवण्यासाठी हजारो झुरळे मारावी लागतात, त्यामुळे ते तयार करणे देखील जवळजवळ अशक्य आहे.
(ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली असून तो वैद्यकीय सल्ला मानला जाऊ नये. आहारात कोणतेही महत्त्वाचे बदल करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.