Inverter Care Tips
Inverter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Inverter Care Tips: इन्व्हर्टर वापरताना घ्या काळजी! अन्यथा संपूर्ण कुटुंबाचा जीव येईल धोक्यात

दैनिक गोमन्तक

आजकाल अनेक लोकांच्या घरात इन्व्हर्टर वापरले जाते. हिवाळ्यात फारशी गरज नसते पण उन्हाळ्यात इन्व्हर्टरशिवाय पर्याय नसतो. अनेक लोक इन्व्हर्टर खरेदी करतात, परंतु त्यांची योग्य अशी काळजी घेत नाहीत. तसे न केल्यास काही वेळा दुर्घना होऊ शकते.अनेक वेळा अशी प्रकरणे ऐकायला मिळतात ज्यामध्ये इन्व्हर्टरचा स्फोट झाला आहे. यामुळे इन्व्हर्टरची काळजी घेणे गरजेचे आहे. इन्व्हर्टरची काळजी न केल्यास इन्व्हर्टरला आग लागून बॅटरीचा स्फोट होण्याचीही शक्यता असते.

  • खराब वायरिंग

जेव्हा तुम्ही घरात इन्व्हर्टर लावत असाल तेव्हा त्याचे सर्व वायरिंग चांगली आहे याची खात्री करावी. वायरिंग योग्य नसल्यास शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. यामुळे योग्य वायरिंगची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

wiring
  • वेळेवर पाणी न भरणे

प्रत्येक इन्व्हर्टरच्या बॅटरीमधील पाण्याची पातळी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.कारण आपण जितका इन्व्हर्टरचा वापर करतो तितके पाणी कमी लागते. डिस्टिल्ड वॉटर इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये वापरले जाते. जर त्याची पातळी कमी झाली तर बॅटरी खराब होऊ शकते. केवळ नुकसानच नाही तर आग लागू शकते. यामुळे वेळोवेळी पाण्याची पातळी तपासणे गपजेचे आहे जर पाणी कमी असेल तर त्यातही पाणी वेळेवर भरावे.

  • तापमानाचे संतुलन ठेवणे गरजेचे

अनेक वेळा आपण इन्व्हर्टर अशा ठिकाणी ठेवतो, जेथे हवा लागत नाही. असे झाल्यावर, इन्व्हर्टर जास्त गरम होते आणि आग लागू शकते. यामुळे इन्व्हर्टर नेहमी अशा ठिकाणी ठेवावे जेथे हवा खेळती राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT