International Yoga Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

International Yoga Day 2023: माहिती नसलेले योगाचे 'हे' फायदे वाचा एका क्लिकवर

संपुर्ण जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जात आहे.

Puja Bonkile

International Yoga Day 2023: योगासने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. साधारणपणे लोकांचा असा विश्वास आहे की योगामुळे केवळ मानसिक आरोग्य चांगले राहते.

पण संशोधकांना असे आढळून आले आहे की मानसिक आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांचा धोका कमी करण्यासाठी नियमित योगा करणे फायदेशीर आहे.

अनेक संशोधनांमध्ये नियमितपणे योगा केल्याने शुगर आणि हृदयविकाराच्या समस्या कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असल्याचे आढळले आहे.

नियमित योगा करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्याचे फायदे माहिती पडावे या उद्देशाने दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर नियमितपणे योगासन केल्यास गंभीर आजार दुर होउ शकतात. जाणून घेऊया योगा करणे किती फायदेशीर आहे.

  • शरीर लवचिक बनते

तंदुरुस्ती राखण्यासाठी शरीर लवचिक ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. योगामुळे लवचिकता वाढते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्याच्या जीवनशैलीतील विस्कळीतपणा आणि शारीरिक निष्क्रियतेच्या अभावामुळे आपल्या शरीराची लवचिकता कमी होत चालली आहे.

त्यामुळे कमी वयात लोकांना वेगाने वाकणे किंवा जमिनीवर बसणे कठीण झाले आहे. लवचिकता नसल्याने पाठदुखीची समस्या वाढत आहे.

  • चिंता आणि तणावाची समस्या दूर होते

योगामुळे तणावाची (Stress) समस्या दूर होण्यास मदत होते. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने केलेल्या संशोधनात असे आढळून आले की जागतिक स्तरावर मोठ्या संख्येने लोक तणाव-चिंता विकारांनी ग्रस्त आहेत.

योगा-श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा नित्यक्रमात समावेश केल्याने मन शांत होण्यास आणि मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत होते. योगाभ्यास, विशेषत: ध्यानधारणा, तुम्हाला शांत करते आणि चांगले-गुड हार्मोन्स सोडण्यास मदत करते.

  • जळजळ होण्याचा धोका कमी करते

शरीरातील अनेक जुनाट आजारांचे मुख्य कारण जळजळ मानले जाते. हृदयविकार, मधुमेह, संधिवात, क्रोहन रोग यासारख्या समस्या जळजळीशी संबंधित आहेत.

अभ्यासाच्या पुनरावलोकनात असे आढळून आले की विविध शैली आणि तीव्रतेचे योग जळजळ कमी करून गंभार आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. यामुळेच हृदयविकार आणि मधुमेहाच्या रुग्णांना नियमित योगा करण्याचा सल्ला दिला जातो.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते

तुमची रोगप्रतिकारक शक्ती संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या धोक्यांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अभ्यासात असे आढळून आले आहे की जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असते.

तेव्हा तुम्ही आजारांना बळी पडतात. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की योगा केल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनवण्यात फायदे आहेत.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Horoscope: भानु सप्तमीचा दुर्मिळ शुभयोग! 'या' राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; मान-सन्मान, यश आणि धनलाभाचे प्रबळ संकेत

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT