Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips To Travel in Goa: गोव्यात ट्रीपला आल्यावर 'हे' कोकणी शब्द नक्की घ्या जाणून

Tips To Travel in Goa: तुम्हीही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात जाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काही कोकणी शब्द नक्की जाणून घ्या.

Puja Bonkile

International Mother Language Day Know these Kokani Words Before Travelling To Goa

दरवर्षी 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहूभाषिकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यादिनानिमित्त काही कोकणी शब्द आणि वाक्यांचा अर्थ जाणून घेऊया.

तुम्ही जर गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गोव्यात फिरतांना तुम्हाला काही कोकणी शब्द माहिती असतील ट्रीपचा आनंद द्विगुणित होईल.

परिचय देतांना

  • गोव्यात गेल्यावर स्वत:ची ओळख सांगताना तुम्ही 'म्हजें नांव...' असे बोलू शकता.

  • तुम्ही इंग्रजी बोलता का ? तुमी इंग्लिश उलयता?

जर तुम्हाला अस्खलित कोकणी समजत नसेल, तर तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांना सामान्य भाषा येत आहे का हे विचारणे गरजेचे आहे. तेव्हा वरील वाक्य वापरू शकता .

  • तुम्ही कुठून आले आहात हे सांगण्यासाठी 'म्हजो गांव...' असे वाक्य वापरू शकता.

  • तुमचे नाव काय आहे? नाव कितें?

तुम्ही तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीशी बोलत असाल तर 'तुझे' आणि मोठ्या व्यक्तीशी बोलत असाल तर 'तुमचे' असे बोलावे.

  • तुम्हाला थोडी कोंकणी भाषा येत असेल तर 'कोंकणी भास थोडी उलोवपाक येता' वाक्य बोलू शकता.

गोव्यात खरेदीसाठी गेल्यावर पुढील वाक्य वापरू शकता

  • हे खूप महाग आहे बोलायचे असेल तर 'खुब म्हारग आसा' असे बोलू शकता.

  • ही वस्तु किती रूपयाला आहे? असे विचारायचे असेल तर “हीं वस्त कितलें रूप्यांची आसा” असे बोलू शकता.

  • 'मला ते नको आहे' असे सांगायचे असेल तर 'म्हाका तें नका ' असे कोकणीत सांगू शकता.

    जर तुम्ही भाव करत असाल आणि तुम्ही निघून जाताना 'म्हाका तें नका' असे बोललात तर दुकानदार तुम्हाला बोलावून कमी किमतीत वस्तू देऊ शकतो.

जेवताना कोणते शब्द वापरावे?

  • 'मला साखर नको' असे सांगायचे असेल तर तुम्ही 'म्हाका साखर नाका' असे बोलू शकता.

  • 'मला ते मसालेदार नको आहे' असे बोलायचे असेल तर तुम्ही 'म्हाका तें मसाल्याचे नाका' असे बोलू शकता.

प्रवास करताना कोणते शब्द वापरावे?

  • प्रति दिन शुल्क किती आहे? असे विचारायचे असेल तर तुम्ही 'दर दिसा फी कितली आसा? असे बोलू शकता.

  • मला रात्रीसाठी एक खोली हवी आहे असे बोलायचे असेल तर तुम्ही 'म्हाका रातचें रावपाक एक रूम जाय' असे बोलू शकता.

  • एखादे ठिकाण किती दूर आहे ? असे विचारायचे असेल तर तुम्ही 'सुवात कतली पयस आसा' असे विचारू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT