Instagram Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Instagram: इन्स्टाग्रामवर तुमची स्वतःची स्टोरी टेम्पलेट तयार करायचीय? मग वापरा 'ही' भन्नाट ट्रिक

फोटो शेअरिंग सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने अलीकडेच यूजर्ससाठी स्टोरी टेम्प्लेट्स नावाचे नवीन फिचर लाँच केले आहे.

Puja Bonkile

Instagram: फोटो शेअरिंग सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने अलीकडेच यूजर्ससाठी स्टोरी टेम्प्लेट्स नावाचे नवीन फिचर लाँच केले आहे. या फीचरमुळे यूजर्स इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करताना GIF, टेक्स्ट आणि गॅलरीमधील फोटो एकत्र करून स्वतःचे टेम्पलेट तयार करू शकतात. तुम्ही देखील या फिचरचा लवकरच वापर करू शकाल. पण या फिचरचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.

  • इन्स्टाग्रामवर टेम्पलेट कसे तयार कराल

इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टेम्पलेट तयार करण्यासाठी होम स्क्रीनवरून उजवीकडे स्वाइप करा आणि स्टोरी मोडवर जावे.

आता टेम्पलेट तयार करण्यासाठी इमेजवर क्लिक करा आणि बॅकग्राउंड सिलेक्ट करावे.

बॅकग्राउंड सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट आयकॉनच्या पुढील स्टिकर टॅप करा आणि 'एड युअर टेम्पलेट' वर क्लिक करावे.

आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला स्टोरीमध्ये टेक्स्ट, इमेज आणि GIF वापरू शकता.

  • तुम्ही दुसऱ्याचे टेम्प्लेट देखील वापरू शकता

या नव्या फीचरचा वापर करून इन्स्टाग्राम यूजर्स इतर कोणाच्यातरी स्टोरी टेम्प्लेट देखील वापरू शकतात.

यासाठी त्या स्टोरीवर जावे 'अॅड युअर प्रॉन्ट' वर क्लिक करावे.

आता तुम्ही या टेम्प्लेटचा भाग असलेली सर्व कटेंट पाहू शकाल आणि तुमच्या सोयीनुसार ते एडिट देखील करू शकता.

या प्रक्रियेअंतर्गत दोन्ही Android आणि iOS यूजर्स Instagram स्टोरी टेम्पलेट तयार करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT