Lifestyle Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lifestyle: तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलत असेल तर ‘या’ पद्धतीने तुम्ही वागा

वारंवार खोटं बोलण्याने डोकं फिरतं किंवा राग येतो. मात्र त्यावेळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की, खोट बोलू नये. असे करणे चुकीचे असते तरीही लोक सर्रास ही गोष्ट करतात. काही लोक विचापूर्वक खोटं बोलण्यासाठी काही कारणांचा आधार घेतात. मात्र तुम्ही कधी तुमच्या पार्टनरला किंवा मित्रांपरिवारात खोटं बोलताना पकडले आहे का? अशातच तुम्ही तुमच्या पार्टनरला सुद्धा उगाचच खोटं बोलताना पकडले असेल तर त्याच्याशी कसे वागावे याबद्दलच आम्ही सांगणार आहोत.

जर तुम्ही एका खोट बोलणाऱ्या व्यक्तीशी डील करत आहात तर तुम्हाला हळू-हळू त्याच्या सवयीचा कंटाळा आणि राग ही येईल. त्यामुळे काही टीप्स वापरुन तुम्ही त्या पद्धतीने वागू शकता.

  • आत्मचिंतन करा- सर्वात प्रथम स्वत:लाच विचारा की आपण ज्या नात्यात आहोत ते खरंच नाते दीर्घकाळ चालेल का? समोरचा व्यक्ती वारंवार खोट बोलतोय आणि आपल्याला ते कळतेय तरीही आपण त्याच्या सोबत का राहतोय याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.

  • राग नियंत्रणात ठेवा- खरं आहे की, वारंवार खोटं बोलण्याने डोकं फिरतं किंवा राग येतो. मात्र त्यावेळी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कारण रागाच्या भरात आपण काहीही बोलतो, करतो त्यावरुन वाद अधिक वाढतो पण तोडगा निघत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास शिका. तुम्ही एखादी गोष्ट विचारा त्याचे उत्तर खरं देण्यास सांगा तेव्हा समोरचा व्यक्ती त्याचे उत्तर हे खोटेच देईल असे वाटत राहिल.

  • खोटं बोलण्याच्या सवयीमागील कारण जाणून घ्या- तुमचा पार्टनर तुमच्याशी वारंवार खोटं का बोलत आहे या मागील कारण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. काही वेळेस मानसिक त्रास किंवा अन्य काही कारणामुळे तो खोट ही बोलत असेल. पण जेव्हा तो मी नाही तर तुच खोटं बोलतेय असे बोलत असेल तर समजून जा त्याची ही सवय कधीच जाणार नाही.

  • आरोप लावू नका- खोटं बोलत असाल तर दुसऱ्यावर आरोप लावू नका. कारण तुम्हाला माहिती असते की, आपण खोटं बोलतोय पण तरीही खोटं बोलणे हे त्या परिस्थितीवर तोगडा काढणे नव्हे.

  • प्रोत्साहन देऊ नका- समोरचा व्यक्ती कोणत्या स्तरापर्यंत खोटं बोलतोय हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारा आणि खोटं बोलण्यास त्यांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका. त्यांची ही सवय सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुम्ही त्यांची सवय बदलण्यास सांगा आणि तो पर्यंत बोलणार नाही असे ही स्पष्ट करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT