Benefits of Aloe Vera Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Aloe Vera: त्वचारोग, रक्तशुद्धीकरणासह कोरफडीचे आहेत असंख्य फायदे, वाचा सविस्तर..

संस्कृतमध्ये कोरफडीला 'कुमारी' तर इंग्लिशमध्ये Aloe Vera असे म्हटले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोरफडीचा वापर केल्यास त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळू शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

आयुर्वेदातील अनेक प्रसिद्ध औषधी वनस्पतींपैकी महत्वाची असलेली वनस्पती म्हणजे कोरफड. संस्कृतमध्ये कोरफडीला 'कुमारी' तर इंग्लिशमध्ये Aloe Vera असे म्हटले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोरफडीचा वापर केल्यास त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळू शकतात. कोरफडीचे झाड हिरवेगार असून ते जाड, मांसल व काटेरी अश्या प्रकारचे असते. बहुतेक घरांमध्ये कुंडीत ही वनस्पती लावलेली आपल्याला आढळते. अशा या आयुर्वेदिक वनस्पतीचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात ते आपण पाहू.

भूक लागत नसल्यास- कोरफड अग्निदीपक आहे. भूक लागत नसल्यास कोरफडीचा रस प्यायल्यास फायदा होतो. कोरफडीची दोन पाने घेऊन किंचित् विस्तवावर शेकवावी. नंतर ती पाने सोलून, आतील गीर काढावा व एका कापडात बांधून घट्ट पिळावा. अशा रीतीने काढलेला रस सुमारे ५ मि.लि.घेऊन त्यात एक चमचा मध घालावा व रोज सकाळी घ्यावा. याने उत्तम भूक लागते, आलेली क्षीणता दूर होते.

Benefits of Aloe Vera

सौंदर्यवर्धक म्हणूनही उपयोगी- कोरफडीच्या पानाचा गर हा जेलीप्रमाणे असतो. तो गर जर दररोज चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होऊन त्वचेला नैसर्गिक तकाकी मिळते व चेहरा मुलायम राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील व्रण, डाग व पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

त्वचारोगावर फायदेशीर- कोरफडीमध्ये एन्टीबॅक्टरिअल (Antibacterial) व अँटीफंगल (Antifungal) व अँटीमाक्रोबल (Antimacrobal ) गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील कोणत्याही आजारासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते.

जीर्णज्वरावर उपयोगी- कोरफड ज्वरन आहे. खूप दिवस ताप येत असल्यास, दिवसातून तीन वेळा (सकाळ-दुपार-संध्याकाळ) कोरफडीच्या १० मि.लि. रसात चार- पाच मिऱ्यांची पूड,अर्धा ग्रॅम पिंपळी व ३ ग्रॅम मध मिसळून घ्यावा. कसल्याही प्रकारचा ताप २-३ दिवसात बरा होतो. तसेच हेच मिश्रण एका आठवडा घेतल्यास जीर्णज्वर म्हणजे नित्य नेमाने येणारा बारीक ताप कमी होतो.

रक्तशुद्धीसाठी- कोरफड रक्तशुद्धी करणारे आहे. कोणत्याही कारणाने शरीरातील रक्त बिघडलेले असेल तर किंवा दूषित झालेले असेल तर कोरफडीचा रस खडीसाखर घालून ६-६ ग्रॅम सकाळ- संध्याकाळ घ्यावा. रक्तदोष कमी होतो. शरीरातील रक्त तापून कोणत्याही एका भागात जास्त जाऊन त्यापासून ग्रंथी अथवा गुल्म झालेला असेल तर कोरफडीचा रस तो नाहीसा करतो. १० ग्रॅम मंजिष्ट ठेचून १०० मि.लि. पाणी घालून त्याचा अष्टमांश काढा करावा. त्यात १० ग्रॅम कोरफडीचा रस, १ ग्रॅम हळद घालून नित्य नेमाने रोज सकाळी घेत गेल्याने २-३ आठवड्यात कोणत्याही कारणाने शरीरात झालेली रक्तग्रंथी बरी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

SCROLL FOR NEXT