Fruits Eating Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Tips: योग्य वेळी आणि पद्धतीने करावे फळांचे सेवन

अवेळी फळांचे सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

प्रत्येक ऋतूमध्ये फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. विशेषतः उन्हाळ्यात फळे खाणे आवश्यक आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत राहते तसेच आरोग्य आणि त्वचाही निरोगी राहते. पण फळांचे (Fruits) पूर्ण पोषण मिळवण्यासाठी फळे खाताना काही चुका करणे टाळले पाहिजे.

* फळ कापून ठेवू नये
अनेक लोक सकाळी फळे खाण्यासाठी कापून ठेवतात. पण असे केल्याने फळांमधील अर्ध्याहून अधिक पोषक तत्वांचा नाश होतो. जेव्हा तुम्हाला फळे खायची असेल तेव्हाच कापावी.

* फळांवर जास्त मीठ टाकू नये
फ्रूट सॅलड बनवून खाताना त्यावर जास्त मीठ टाकू नये. मिठाचे अधिक सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विशेषत: यामुळे फळांचे पोषण मिळत नाही आणि अतिरिक्त सोडियम देखील आपल्या शरीरात जाते.

* आंबट फळांसह कॉफी-चहा घेणे टाळावे
अनेकदा लोक फ्रूट सॅलडसोबत कॉफी पिताना दिसतात. यामुळे त्वची संबंधित आणि पोटासंबंधीत आजार उद्भवू शकतात.यामुळे फळांचे सेवन केल्यानंतर चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.

* सफरचंद सेवन सालीसह करावे
अनेकांना सफरचंदाची साल आवडत नाही. यामुळे साल काढून सफरचंद खातात. पण सर्वाधिक पोषक घटक हे सफरचंदाच्या सालीमध्ये असते. यामुळे निरोगी आरोग्यासाठी सफरचंद सोललेले कधीच खाऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT