Simple Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Watermelon Peels: टरबूजाची सालं फेकून न देता असा करा घरगुती कामांसाठी वापर

Watermelon Peels: टरबूजाच्या सालीचा उपयोग फक्त तुमची त्वचा सुधारण्यासाठी किंवा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठीच नाही तर अनेक प्रकारे करू शकता.

Puja Bonkile

how to use watermelon peels for home cleaning

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी रसाळ फळ खाणे फायदेशीर असते. तुम्ही टरबुज,संत्री, खरबुज यासारख्या फळांचे सेवन करू शकता.

तुम्हाला टरबुज्या सालीचा वापर कसा करवा माहिती नसेल तर आज जाणून घेऊया. टरबुजाच्या सालीचा वापर करून घरातील अनेक काम सोपे करू शकता.

फरशीवरचे डाग काढण्यासाठी

घरातील फरशांवरील हळद किंवा अन्नाचे डाग काढले जात नसतील तर टरबूजाच्या सालीच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता.

टरबूजाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ते तुम्हाला खोलवरचे डाग स्वच्छ करण्यास मदत करू शकतात.

यासाठी टरबूजाची साले बारीक करून त्यात एक चमचा डिशवॉशिंग लिक्विड घालावे.

यानंतर हे मिश्रण डागावर लावून स्वच्छ केल्यावर डाग सहज स्वच्छ होईल.

चिकटपणा कमी करण्यासाठी

स्वयंपाकघरात ठेवलेली तेलाची बाटली अस्वच्छ दिसते. तेल संपेपर्यंत तुम्ही ते धुत नाही. पण टरबूजाच्या सालीच्या मदतीने तुम्ही ते स्वच्छ करू शकता.

यासाठी एका भांड्यात टरबूजाच्या सालीची पेस्ट तयार करावी लागेल.

यानंतर हे मिश्रण बाटलीवर लावा आणि कापडाच्या मदतीने स्वच्छ करा.

असे केल्याने बाटलीच्या ग्रीसमुळे बाटलीवर अडकलेली घाणही निघून जाईल.

खत म्हणून वापर

टरबूज हे एक थंड फळ आहे. म्हणून त्याची साल देखील खूप फायदेशीर आहे. ते तुम्ही तुमच्या घरच्या बागेत वापरू शकता. टरबूजाच्या सालीपासून बनवलेले खत तुमच्या झाडांना ताजे आणि हिरवे ठेवण्यास मदत करते. याच्या मदतीने तुम्ही द्रव खत बनवू शकता, जे दररोज वनस्पतींवर वापरण्यास सोपे आहे.

यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात पाणी घ्यावे.

आपल्याला पुरेसे पाणी घ्यावे लागेल ज्यामध्ये साले बुडतील.

यानंतर, ते चांगले झाकून ठेवावे आणि 3 दिवस तसेच राहू द्यावे.

तीन दिवसांत तुम्हाला दररोज एकदा थंड पाण्यात मिक्स करावे लागेल.

आता तुमचे लिक्विड खत तयार आहे. एका बाटलीत पाणी भरून ते झाडांवर फवारावे.

त्यामुळे झाडांची पाने टवटवीत राहून फुलेही चांगली येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT