Relationship Tips How To Say Sorry Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: नात्यात Sorry कसं म्हणावं?

What is the best way to apologize: नात्यातला माणूस जर का महत्वाचा असेल तर त्याला किंवा तिला सॉरी म्हणताना किंतु-परंत्तू निर्माण होऊ नये

Akshata Chhatre

Apology in relationships:

पणजी : आपण प्रत्येकजण काही ना काही चुका नक्कीच करतो, त्यानंतर त्या चुकीची जाणीव होते पण समोरच्याला सॉरी कसं म्हणावं असा प्रश्न पडतो. सॉरी हा शब्द वाटतो तेवढा सोपा नाही, एखाद्याला सॉरी म्हणण्यात आपल्याला कमीपणा वाटू शकतो. पण नात्यातला माणूस जर का महत्वाचा असेल तर त्याला किंवा तिला सॉरी म्हणताना किंतु-परंत्तू निर्माण होऊ नये. चला जाणून घेऊया आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीला सॉरी म्हणावं तरी कसं?

माफी मागण्याची कला:

व्यक्ती कितीही जवळची असली तरीही कधी ना कधी ती आपल्याकडून दुखावली जाते आणि चुकीच्या प्रकारे माफी मागितल्याने परिस्थिती आणखीन चिघळते. "माफ कर" किंवा "जर मी तुला दुखावले असेल तर माफ कर..." यामुळे दुसऱ्या व्यक्तील निराश वाटू शकते, तसेच आपल्यालाही ते अस्वस्थ करू शकते. पण प्रामाणिकपणे, नम्रपणे आणि समजूतदारपणाने मागितलेली माफी नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांना मजबूत करणारे एक प्रभावी साधन ठरू शकतं.

माफी मागणे का कठीण आहे?

माणसांमध्ये माफी मागणे अनेकदा कठीण ठरते कारण; चुक कबूल करण्यासाठी नम्रपणा आवश्यक आबे आणि थेट माफी मागताना असुरक्षित देखील वाटू शकतं. अनेकदा व्यक्तीला भीती वाटते की त्याची माफी स्वीकारली जाणार नाही किंवा त्याच्यावर अधिक टीका केली जाईल, परिणामी तो माणूस माफी मागण्यापासून परावृत्त होतो.

माफी कशी मागाल?

एक गोष्ट लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीची माफी मागताना तिला किंवा त्याला तुमच्या बोलण्यातला खरेपणा दिसला पाहिजे. तुम्ही किती गोड-गोड शब्द वापरता किंवा किती गोष्टी रंगवता हे महत्वाचं नसतं, त्यामुळे होईल तेवढी थेट माफी मागा. "मी माफी मागतो" या साध्या शब्दांत समोरच्याची माफी मागून टाका.

असं झालं, तसं झालं म्हणत स्पष्टीकरण देत बसू नका, यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही मनापासून खेद व्यक्त करताय असं वाटणार नाही. स्पष्टीकरण देणारे शब्द शक्यतो टाळा, यामुळे तुमचा खरेपणा दिसून येत नाही आणि केवळ माफीची तीव्रता होईल. "माझ्यामुळे तुला जो त्रास झाला" असं म्हणत तुम्ही जी माफी मागताय आणि ज्या चुकीमुळे माफी मागताय त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा.

यानंतर तुम्हाला माफी मिळेल याची अपेक्षा न ठेवता पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करा, कारण तुम्हाला माफ करावं की नाही हा त्या व्यक्तीचा निर्णय असणार आहे. तुम्ही कोणाला जबरदस्ती करण्याचा अट्टाहास करू नका आणि गोष्टी सुरळीत झाल्यानंतर विश्वास संपादन करत नात्याची सुरुवात करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT