Sameer Amunekar
संवाद न साधणे किंवा एकमेकांच्या भावना ऐकून न घेतल्यामुळे नात्यात दुरावा येतो. नेहमी उघडपणे आणि सन्मानाने संवाद साधा. गैरसमज दूर करण्यासाठी शांतपणे चर्चा करा.
खोटं बोलणे, गोष्टी लपवणे, किंवा जोडीदाराच्या विश्वासाला तडा देऊ नका. नेहमी प्रामाणिक रहा आणि जोडीदाराच्या विश्वासाला धक्का लागू देऊ नका.
नातं टिकवायचं असेल तर काही चुका टाळणं खूप महत्त्वाचं असतं. या चुका टाळल्याने नातं आयुष्यभर टिकण्यास मदत होऊ शकते.
प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मत ठामपणे लादणे किंवा जोडीदाराच्या मताला महत्त्व न देणे असं करू नका. एकमेकांचे विचार, मतं, आणि निर्णय यांचा आदर करा.
जोडीदाराकडून अतीरीक्त अपेक्षा ठेवू नका. गरजांबाबत स्पष्ट रहा, पण अपेक्षा वाजवी ठेवा.
वाद झाल्यावर दुर्लक्ष करणे किंवा बोलणे टाळू नका. गैरसमज त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करा. संवाद कायम ठेवा.