Guava Chutney Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Guava Chutney Recipe: आंबट अन् चवदार पेरू चटणी हिवाळ्यात वाढवेल जेवणाची चव!

एकाच प्रकारची चटनी खाउन बोर झाले असाल तर पेरुची चटनी नक्की चाखुन पाहा.

दैनिक गोमन्तक

Guava Chutney Recipe: हिवाळ्यात आंबट अन् चवदार चटणीचा आहारात समावेश केला तर जेवणाची चव दुप्पट होते. आवळा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण इत्यादी टाकून बनवलेली हिरवी चटणी चवीला अप्रतिम असते. पण आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

कोथिंबीरीची चटणी असो की आवळा चटणी, हे सर्व खूप आरोग्यदायी आहेत. तुम्ही आवळा आणि कोथिंबीरीची चटणी खूप खाल्ली असेल, पण पेरूची चटणीची चव चाखली आहे का?नाही तर नक्की ट्राय करा. पेरूपासूनही तुम्ही पटकन मसालेदार, आंबट, गोड चटणी बनवू शकता.

  • पेरूची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बीया काढलेले पेरू - 1/2

कोथिंबीर पाने - 50 ग्रॅम

हिरवी मिरची - 2/3

आले - 1 तुकडा

लिंबाचा रस - 1 टीस्पून

जिरे पावडर - अर्धा टीस्पून

मीठ - चवीनुसार

काळे मीठ - चवीनुसार

Guava Chutney Recipe

पेरू चटणी रेसिपी

पिकलेले पेरू घ्यावे. ते कापून सर्व बिया काढून टाकावे.

कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले पाण्याने चांगले धुवून घ्या. हिरवी मिरची आणि आले कापून घ्या.

आता पेरू, कोथिंबीर, हिरवी मिरची मिक्सरमध्ये टाका. हे तीन पदार्थ एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आता त्यात जिरेपूड, आले, मीठ, काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला.

पुन्हा बारीक करून त्याची पेस्ट बनवा.

तुम्हाला जितकी चटणी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घटकांचे प्रमाण घेऊ शकता.

आंबट गोड आणि मसालेदार पेरू चटणी तयार आहे. भात, रोटी आणि चपाती इत्यादी सोबत खाण्याचा आस्वाद घेउ शकता.

रोज एकच चटणी खाउन बोर झाले असाल तर तर गोड आणि आंबट पेरूची चटणी नक्की बनवून बघा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT