Tea Time Snacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea Time Snacks: चहासोबत घ्या क्रिस्पी पोटॅटो बाइट्सचा आस्वाद, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही क्रिस्पी आणि चवदार पोटॅटो बाइट्सचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

Tea Time Snacks: संध्याकाळी भुक लागल्यावर लहान मुलांना काही तरी चटपटीत स्नॅक्स हवे असते. रोज ठाराविक पदार्थ खायला कंटाळा आला असेल तर तुम्ही बटाट्यापासून पोटॅटो बाइट्स खास रेसिपी बनवू शकता. तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत पोटॅटो बाइट्सची आस्वाद घेऊ शकता. लहान मुले आणि मोठ्यांना हा स्नॅक नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी पोटॅटो बाइट्स बनवण्याची रेसिपी.

  • क्रिस्पी पोटॅटो बाइट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बटाटे

कॉर्न फ्लोअर

किसलेले पनीर

बारीक चिरलेली कोथिंबीर

काळी मिरी पावडर

ओरेगॅनो

चिली फ्लॅक्स

तेल

मीठ चवीनुसार

  • क्रिस्पी पोटॅटो बाइट्स बनवण्याची कृती

क्रिस्पी पोटॅटो बाइट्स बनवण्यासाठी सर्वात पहिले बटाटे स्वच्छ धुवावे. यासाठी बटाट्याचे ४ तुकडे करावे. नंतर एका भाड्यांत पाणी गरम करून त्यात बटाटे उकळावे.नंतर हे बटाटे मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.

नंतर बटाट्यामध्ये मीठ, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, बारिक चिरलेली कोथिंबीर , किसलेले पनीर आणि चिली फ्लेक्स घालावे. सर्व मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर त्यात कॉर्न फ्लोअर घालून पुन्हा मिक्स करावे. त्याला गोल आकार देऊन छोटे बॉल बनवून घ्यावे. नंतर गरम तेलात सोनेरी रंगात तळून घ्यावे. तयार आहेत तुमचे पोटॅटो बाइट्स. सॉस किंवा चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT