Gardening Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: घरात जागेची कमतरता असेल तर तुम्ही 'या' फळं आणि भाज्यांची करू शकता लागवड

Gardening Tips: अशी काही झाडे आहेत जी कमी जागेत सहज वाढवता येतात. यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

how to grow vegetable and fruits in small space read Gardening Tips

अनेक लोकांना बागकाम करायची आवड असते. पण घरी पुरेशी जागा नसल्याने ते करू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का काही अशा भाज्या आणि फळं आहेत जे कमी जागेत चांगले वाढतात. तुम्ही घरातील बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर हे पिक घेऊ शकता. अशी कोणती पिकं आहेत हे जाणून घेऊया.

टोमॅटो

टोमॅटोची रोपे वाढवण्यासाठी लाकडी काडीचा आधार घेऊन लागवड करू शकता. तुमच्या टेरेस, बाल्कनी किंवा अंगणात टोमॅटोची रोपे वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हे केवळ तुमची जागा वाचवत नाही तर तुम्ही अधिक उत्पादनक्षम देखील होऊ शकता.

टोमॅटोचे अनेक प्रकार वाढवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वसाधारणपणे चांगली प्रजाती वाढवण्यासाठी तुम्हाला भांडेची उंची आणि परिमाण लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

बीन्स

तुम्ही बाल्कनी आणि टेरेसवरही बीन्सची शेती करू शकता. बीन्सचे रोप लावायला जास्त जागा लागत नाही. तुम्ही लटकत्या कुंड्यांमध्ये लावू शकता.

द्राक्षे

बाल्कनी किंवा गच्चीवर द्राक्षांची लागवड करू शकता. खासकरून जेव्हा तुमच्याकडे कमी जागा असेल आणि तुम्हाला तुमच्या जागेवर मर्यादित जागेत फळे वाढवायची असतील तर तुम्ही द्राक्षाचे रोप एका भांड्यात लावू शकता आणि बाल्कनीच्या रेलिंग किंवा लाकडाच्या मदतीने वरच्या बाजूस वाढवू शकता

काकडी

बाल्कनी किंवा टेरेसवर वाढण्यासाठी काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. काकडीचा वेल कमी जागेत वाढतो. हा वेल लावायला कोणत्याही विशेष जागेची गरज नाही, ज्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे.

या गोष्टीही ठेवा लक्षात

भिंतींवर ट्रेली लावून तुम्ही उभे झाडे लावू शकता.

तुम्ही टांगलेल्या टोपल्या वापरून फळे आणि भाज्या देखील लावू शकता.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करून तुम्ही बागकाम करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT