Monsoon Breakfast Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Breakfast Recipe: दिवसाची सुरूवात करा कॉर्न पराठ्याने,दिवसभर राहाल एनर्जेटिक

पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यात घ्या कॉर्न पराठ्याचा आस्वाद

Puja Bonkile

Monsoon Breakfast Recipe: पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि दिवभर एनर्जेटिक राहण्यासाठी असा काही नाश्ता करायला आवडतो. नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खाणे गरजेचे असते.

सध्या मस्त पाऊस पडत आहे. तुम्हालाही काहीतरी नवीन खावेसे वाटत असेल तर असाच एक स्वादिष्ट पदार्थ म्हणजे कॉर्न पराठा. बनवायला झटपट असून आरोग्यदायी देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया कॉर्न पराठा कसा बनवायचा.

  • कॉर्न पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कॉर्न

मैदा

बेसन

आले-लसूण पेस्ट

कांदा

हिरवी मिरची

हळद

जिरे

लाल तिखट

कोथिंबीर

तेल गरजेनुसार

मीठ चवीनुसार

  • कॉर्न पराठा बनवण्याची कृती

कॉर्न पराठा बनवण्यासाठी सर्वात पहिले कॉर्न उकळवे.

नंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यावे.

यानंतर कांदा बारीक, मीठ, पाणी घालून पराठ्यासाठी पीठ मळून घ्यावे.

आता कढईत थोडे तेल टाकावे.

त्यात जिरे आणि बेसन घालून चांगले परतून घ्यावे.

थोडा वेळ भाजल्यानंतर त्यात लसूण-आलं पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची पेस्ट घालून 4-5 मिनिटे शिजवा.

कांदे मऊ आणि हलके तपकिरी रंगाचे झाल्यावर त्यात लाल तिखट, कोथिंबीर, बारीक वाटलेली कणीस आणि हळद घालून चांगले मिक्स करा.

आता झाकण ठेवून 4-5 मिनिटे शिजू द्यावे.

आता हे सारण पराठ्यासाठी तयार आहे.

नॉनस्टिक तवा ठेवून त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा.

यानंतर पिठाचे गोळे करून लाटून घ्या.

यानंतर तयार केलेला मसाला गोळ्याच्या मधोमध ठेवून चारही बाजूंनी बंद करून गोल किंवा त्रिकोणी आकारात लाटून घ्या.

आता हा पराठा तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.

हिरवी चटणी, दह्यासह आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT