Hara Bhara Kabab Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hara Bhara Kabab Recipe: तोंडाची चव बदलेल 'हरा भरा कबाब!' एकदा नक्की ट्राय करा

तुमच्या तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

दैनिक गोमन्तक

Hara Bhara Kabab Recipe: हरा भरा कबाब हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. हे कबाब स्नॅक म्हणून किंवा लंच किंवा डिनरमध्ये स्टार्टर म्हणून मोठ्या चवीने खाल्ले जातात.

हे चवदार असण्यासोबतच हा पदार्थ अतिशय आरोग्यदायीही (Healthy) आहे. जर तुम्ही घरी पार्टी आयोजित केली असेल तर स्टार्टर म्हणून हरा भरा कबाब बनवता येईल.

हिरवे कबाब बनवण्यासाठी पालक, बटाटे, मटार यासह मसाल्यांचा वापर केला जातो. हरा भरा कबाब तुम्ही घरी हॉटेलप्रमाणे तयार करू शकता. हरा भरा कबाब (Hara Bhara Kabab) बनवणे खूप सोपे असुन झटपट तयार होते. जर तुम्हालाही हा पदार्थ बनवाचा असेल तर ही रेसिपी आजच नोट करा.

  • हरा भरा कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पालक - 2 कप

वाटाणे - 1/2 कप

उकडलेले बटाटे - 2-3

किसलेले आले - 1/2 टीस्पून

हिरवी मिरची - 1/2

ब्रेडक्रंब - 3 टेस्पून

भाजलेले बेसन - 3 चमचे

हळद - 1/4 टीस्पून

गरम मसाला - 1/4 टीस्पून

वेलची पावडर - 1 चिमूटभर

सुका आंबा - 3/4 टीस्पून

कोथिंबीर - 3 चमचे

तेल - 3 चमचे

मीठ - चवीनुसार

हरा भरा कबाब बनवण्याची कृती

चवदार कबाब बनवण्यासाठी सर्वपहिले पालक स्वच्छ धुवून घ्यावा. यानंतर, बटाटे आणि वाटाणे उकळवा. यानंतर बटाटे सोलून घ्या. आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात पालक टाकून उकळवा.

पालक काही वेळ उकळल्यानंतर पालक गाळून घ्या म्हणजे पाणी पूर्णपणे निघून जाईल. यानंतर लगेचच पालक थंड पाण्यात टाका आणि सुमारे 1 मिनिट ठेवल्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढा. यानंतर पालकाचे बारीक तुकडे करा.

नंतर एका कढईत 1 चमचा तेल टाका आणि मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात उकडलेले वाटाणे घालून 1-2 मिनिटे परतावे. यानंतर चिरलेला पालक आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून सर्व गोष्टी तळून घ्या.

पालक आणि मटारचे पाणी पूर्णपणे सुकल्यावर त्यात हिरवी कोथिंबीर आणि हळद टाका आणि मिक्स करून आणखी 1 मिनिट परतून घ्या, त्यानंतर गॅस बंद करा. आता हिरवी मिरची आणि आले बारीक वाटून घ्या आणि उकडलेले बटाटे किसून घ्या. एका भांड्यात किसलेले बटाटे, हिरवी मिरची आले पेस्ट, गरम मसाला, सुकी कैरी पावडर, वेलची पूड घालून मिक्स करा. यानंतर मिश्रणात भाजलेले बेसन, ब्रेडचा चुरा आणि मीठ मिसळा. शेवटी पालक आणि वाटाणे घालून सर्व साहित्य चांगले मॅश करा आणि मिश्रण तयार करा.

आता थोडेसे मिश्रण हातात घेऊन कबाबचा गोल आकार द्या. सर्व मिश्रणातून हिरवे कबाब बनवा. आता एक नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल घाला.

तव्याच्या क्षमतेनुसार कबाब ठेवा आणि भाजून घ्या. थोड्या वेळाने, कबाब उलटा करा आणि सर्व बाजूंनी थोडे तेल घाला. काही वेळाने कबाब सोनेरी आणि कुरकुरीत झाले की ताटात काढा. तसेच सर्व हिरवे कबाब भाजून घ्यावेत. चविष्ट कबाब तयार आहेत. त्यांना हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT