Fruit Sandwich Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Tips: मुलांसाठी बनवा कलरफुल अन् स्वादिष्ट 'फ्रुट सँडविच'

Fruit Sandwich Recipe: लहान मुलांसाठी जर तुम्हाला काही वेगळ्या आणि आरोग्यदायी पदार्थ बनवायचे असेल तर 'फ्रुट सँडविच' नक्की ट्राय करून पहा

दैनिक गोमन्तक

मुलांना जेवणासाठी काय द्यायचे याबाबत अनेक महिला अनेकदा गोंधळून जातात. त्याच वेळी, मुले खाण्यापिण्याबद्दल खूप किच-किच करतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांना आरोग्यदायी (Healthy) आणि चवदार काहीतरी द्यायचे असेल तर त्यांच्यासाठी फ्रूट सँडविच उत्तम असू शकते. या सँडविचची खास गोष्ट म्हणजे तुम्ही हे काही मिनिटांमध्ये तयार करू शकता. तसेच ते पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तुमचे मूल सुध्दा आवडीने हा पदार्थ खातील. चला जाणून घेऊया हेल्दी फ्रूट सँडविचची रेसिपी- (Fruit Sandwich Recipe News)

फ्रूट सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ब्रेडचे तुकडे - 5

  • मलाई - 3 चमचे

  • द्राक्षे - 10-12

  • आंबा बारिक चिरलेला - 1/2 कप

  • सफरचंद चिरून - 1/2 कप

  • जॅम (3-4 प्रकार) - आवश्यकतेनुसार

  • अक्रोड पावडर - आवश्यकतेनुसार

फ्रूट सँडविच बनवण्यासाची पध्दत

  • लहान मुलांसाठी फ्रूट सँडविच (Fruit Sandwich) तयार करण्यासाठी, प्रथम ब्रेडचे दोन तुकडे करा. नंतर त्याच्या कडा कापून घ्या.

  • यानंतर आंबा, द्राक्षे आणि सफरचंद या फळांचे छोटे तुकडे करा.

  • यानंतर, सर्व प्रकारचे जाम वेगवेगळ्या भांड्यात काढा.

  • आता हे जाम ब्रेडच्या स्लाइसवर लावा. त्यावर अक्रोड पावडर घाला.

  • ब्रेडवर जॅम लावल्यानंतर त्यावर मलाई टाका आणि सर्व बाजूंनी चांगले पसरवा.

  • यानंतर त्यावर सर्व प्रकारची फळे घाला. त्यावर ब्रेड ठेवा.

  • आता त्याचे दोन भाग करा आणि मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करा.

  • हे फ्रूट सँडविच नक्की घरी करून पहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT