Health Benefits Of Daliya Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Benefits Of Daliya: 'या' आजारांवर दलिया ठरतो रामबाण उपाय

दिवसाची सुरुवातीला किंवा रात्रीच्या जेवणात दलियाचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते.

दैनिक गोमन्तक

Health Benefits Of Daliya: रोजच्या डोकेदुखीत 'आज नाश्त्यात काय खावे' हा प्रश्न विशेषत: महिलांना रोज रात्री पडत असतो. सकाळी उठल्यावर नाश्त्यात काय करायचं हा प्रश्न पडतो. दलिया न्याहारीसाठी एक उत्तम पदार्थ आहे. पण दलियाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण कुणाला दलियाची चव आवडते तर, कुणाला नाही. दलिया खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

दलियामध्ये कोणते पोषक घटक आढळतात?

दलिया हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे एक अद्भुत संयोजन आहे. गहू भाजून दळून ते तयार केले जाते. दलियामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. तुम्ही नाश्तासाठी, स्नॅकच्या वेळेत किंवा रात्रीच्या जेवणासाठी दलिया खाऊ शकता. दलिया दोन प्रकारे तयार आणि खाल्ले जाते. तुम्ही गोड दलिया (Daliya) देखिल खाउ शकता. जी तुम्ही दुधात घालून खीरसारखी शिजउ शकता. आणि दुसरी पध्दत म्हणजे जिरे, हिंग, कढीपत्ता वगैरे टाकून दलिया काउ शकता. ही खिचडी किंवा उपमा सारखी तयार केली जाते.

तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी दोन्ही प्रकारचे दलिया खाऊ शकता. फक्त हे लक्षात ठेवा की दुधापासून बनवलेला दलिया खाताना, मीठयुक्त पदार्थ एकत्र खाऊ नका. गोड दलिया बनवताना तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता.

दलिया खाण्याचे फायदे

  • पचनक्रिया सुरळित चालते. जर तुम्हाला अपचन आणि गॅसची समस्या असेल तर दिवसातून एकदा दलिया नक्की खा.

  • जर तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत असेल आणि अनेकदा काही आजार तुम्हाला घेरतात, तर तुम्ही दिवसातून एकदा दलियाचे सेवन करावे.

  • मुलांच्या वाढीस प्रोत्साहन देते. चांगली उंची आणि आरोग्यासाठी, मुलांना एका वेळी दलिया खायला दिली पाहिजे.

  • झोपेची (Sleep) समस्या असेल तर दलियाचे सेवन करावे.

  • ज्या लोकांना रक्तदाब कमी आहे किंवा कमजोरी आहे, त्यांनीही दिवसातून एकदा दलिया खावे.

  • बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दलियाचे सेवन करा. पोट निरोगी राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT