Day Cream Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Anti-Aging Day Cream: घरीच बनवा एंटी-एजिंग डे क्रिम, दिवसभर चेहरा दिसेल ग्लोइंग

काकडीपासून बनवलेले हे होममेड डे क्रीम त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.

Puja Bonkile

Anti-Aging Day Cream: त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. ज्यामुळे त्वचा चमकदार राहिल. पण तुम्ही काही घरगुती उपाय करुन देखील त्वचा चमकदार ठेऊ शकता.

जर तुम्ही काकडीपासून घरी बनवलेले क्रिम वापरले तर त्वचा चमकदार राहिल. तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन देखील कमी होइल. काकडीत व्हिटॅमिन-सीचे प्रमाण चांगले असते. म्हणूनच, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर (Face) काकडीचे क्रिम लावले तर अनेक फायदे होउ शकतात.

  • काकडी डे क्रीमचे फायदे कोणते

काकडी आरोग्यासह चेहऱ्यासाठी फायदेसीर असते. तसेच काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. तसेच वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील असतात आणि ते तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्हाला मुलायम आणि चमकदार त्वचा मिळते. 

  • काकडीची डे क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1- काकडी 

2-3 थेंब - लॅव्हेंडर एसेंशियल ऑइल

1 टीस्पून - ग्लिसरीन 

3-4 थेंब - व्हिटॅमिन ई ऑइल

1 टीस्पून - एलोवेरा जेल  

  • काकडीचे क्रिम बनवण्याची पद्धत

काकडीची डे क्रीम बनवण्यासाठी प्रथम काकडी धुवून स्वच्छ करावे. नंतर काकडी किसून घ्यावी आणि एका भांड्यात ठेवावी.

यानंतर काकडचा रस वेगळा काढावा आणि नंतर एका लहान भांड्यात कोरफड जेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन-ई तेल घालावे.

यानंतर, या सर्व गोष्टी चांगले मिक्स करावे आणि नंतर त्यात काकडीचा रस आणि आवश्यक तेल घालावे.

ते फेटून चांगले मिक्स करावे. नंतर तयार मिश्रण एका छोट्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

हे क्रीम सुमारे 21-25 दिवस साठवून वापरू शकता. 

  • काकडीचे क्रिम कसे लावावे

काकडीची डे क्रीम लावण्यापूर्वी चेहरा (Face) धुवून स्वच्छ पुसून घ्यावे आणि नंतर हे क्रीम गाल, कपाळ, नाक, हनुवटी आणि मानेवर लावावे. यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरची चमक टिकून राहिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT