Home Tips For Cleaning Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Tips For Cleaning: घरातील दारांची हँडल काळी पडली असेल तर अशा प्रकारे करा स्वच्छ

जर तुमच्या घराच्या दारांची हँडल घाण आणि काळे झाले असतील तर या टिप्सचा वापर करून तुम्ही सहज स्वच्छ करू शकता.

Puja Bonkile

Home Tips For Cleaning: अनेक लोकांना घर स्वच्छ ठेवण्याची आवडते असते. पण अनेकवेळा घर स्वच्छ करून देखील काही तरी राहूनच जाते. ते म्हणजे दार आणि खिडक्यांचे हँडल. हे स्वच्छ करायला खुप वेळ जातो. तसेच हे काम करणे कठिण देखील आहे.

धूळ वारंवार साचल्यामुळे आणि सतत हात लावल्याने हँडल काळे होतात. त्यामुळे ते अगदी घाणेरडेही दिसतात. लोक त्यांना स्वच्छ करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करतात, पण रिझल्ट दिसत नाही. चला तर मग जाणून घेऊया सिंपल टिप्स ज्यामुळे हँडल स्वच्छ होतील.

  • तांबे आणि पितळा हँडल

बहुतेक लोक घराच्या दारात पितळ किंवा तांब्याचे हँडल लावतात. सुरुवातीला ते आश्चर्यकारक दिसते. पण त्यांना रोज स्पर्श केल्याने ते काळे होतात आणि नंतर खूप घाण दिसतात. अशावेळी तुम्ही त्यांना स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करू शकतात.

1 चमचा मैदा, 1 चमचा पांढरा व्हिनेगर आणि 1 चमचे मीठ मिक्स करा. ही पेस्ट पितळेच्या किंवा तांब्याच्या हँडलवर चोळा. 2-3 मिनिटे राहू द्या, आता कोमट पाण्याने स्वच्छ करा. हे हँडल्स नवे दिसेल. 

  • क्रोम आणि निकेल हँडल

आजकाल क्रोम आणि निकेलचे डोअर हँडल ट्रेंडमध्ये आहेत. आपण त्यांना नियमितपणे स्वच्छ न केल्यास त्यांची चमक कमी होते.  ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही 1/2 चमचे डिशवॉश लिक्विड, 1 ग्लास पाण्यात मिक्स करा आणि चांगले मिक्स करावे. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा.

आता हँडलवर स्प्रे करा आणि मऊ कापडाच्या मदतीने स्वच्छ करा. तुमचे दाराचे हँडल चांदीसारखे चमकू लागतील.

  • स्टेनलेस स्टील हँडल

तुमच्याकडे स्टेनलेस स्टीलच्या दरवाजाची हँडल असल्यास, ते स्वच्छ करण्यासाठी सामान्य डिश वॉशिंग लिक्विड पाण्यात मिक्स करून हँडलवर लावावे आणि कापडाने घासून घ्यावे.

जर हँडलवर जास्त डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि व्हाईट व्हिनेगरचे मिश्रण तयार करावे. कापडाच्या मदतीने हँडलवर लावा आणि स्वच्छ करावे. असे केल्याने हँडल नव्यासारखे चमकेल.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT