Home Remedies For Weakness Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies For Weakness: आजारपणामुळे जाणवतो थकवा, एनर्जी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Home Remedies For Weakness: जर तुम्हाला आजारपणामुळे शरिरात कमजोरी आणि थकवा जाणवत असेल तर तुम्हाला काही पोषक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.

Puja Bonkile

home remedies these best foods for body weakness

दीर्घ आजारातून बरे झाल्यानंतर लोकांना अशक्त किंवा थकवा जाणवतो. शरीराला एनर्जेटीक ठेवण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे असते. आहारात फळं,पालेभाज्या आणि अंडी यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो.

तज्ज्ञांच्या मते खाण्यापिण्याच्या सवयींची योग्य काळजी घेतली तर आरोग्या संबंधित अनेक समस्या दूर होतात. खरं तर आपण जे काही पदार्थ घेतो, त्यातून शरीराला पोषण मिळते. त्यामुळे आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

अंडी

शरीर मजबूत राहण्यासाठी प्रथिनांची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी अंड्यांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. पण सोयाबीन आणि इतर शाकाहारी पदार्थांमध्येही प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु अंड्यांमध्ये आढळणारे प्रथिने शरीराद्वारे सहज शोषले जाते. यामुळे अंड्याचे सेवन शरीर सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

दुग्ध उत्पादने

दूध, दही, पनीरआणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन शरीराच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम यासारखे पोषक घटक डेअरी उत्पादनांमध्ये आढळतात. हे सर्व पोषक घटक शरीर निरोगी आणि उत्साही ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.

डाळिंब

डाळिंब खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. डाळिंब खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. डाळिंबात आढळणाऱ्या व्हिटॅमिन्स, पोटॅशियम आणि झिंक सारख्या पोषक तत्वांमुळे ते शरीराला निरोगी बनवण्यात मदत करते.

हिरव्या भाज्या

रोज आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. निरोगी राहण्यासाठी महत्वाचे आहे. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना हिरव्या भाज्या खायला आवडतात आणि त्यांच्यापासून दूर राहिल्यामुळे आजारी पडतात.

शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हिरव्या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच त्यामध्ये बीटा-कॅरोटीन चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढते.

नारळ पाणी

नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जाही मिळते. खरं तर, शरीरासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांसोबतच त्यात अँटिऑक्सिडंट्स, अमीनो-ॲसिड आणि एन्झाईम्स मुबलक प्रमाणात आढळतात. जर तुम्ही दररोज नारळ पाणी पित असाल तर शरीरातील कमजोरी लवकरच कमी होऊ शकते.

केळी

केळ्यामध्ये आयरन, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे केळीच्या सेवनाने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि आजारपणामुळे शारीरिकदृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही रोज केळीचे सेवन केले पाहिजे.

खजुर

खजूरमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्याच वेळी, यामध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात आढळते. यामुळे पचनशक्ती मजबूत होते.

अनेकदा आजारपणानंतर लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित इतर समस्या दूर होतात. खजुराचे सेवन पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी होण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय खजूरमध्ये आढळणारे कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक आणि जीवनसत्त्वेही शरीराला निरोगी बनवतात.

सुकामेवा

प्रथिने आणि फायबरसोबतच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे नट आणि ड्रायफ्रूट्समध्ये आढळतात. त्यामुळे दीर्घ आजारामुळे तुमची शक्ती कमी झाली असेल तर तुम्ही सुकामेवा खावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT