Home Remedies For Acidity: आपल्या जेवणामध्ये अनेकदा भाजीची चव वाढवण्यासाठी आपण कोथिंबीरीचा वापर करत असतो. परंतु याशिवाय कोथिंबीर, त्याच्या पानांचा आणि कोथिंबीरीच्या बियांचा म्हणजेच धन्याचा वापर इतरही अनेक प्रकारे केला जातो, जो आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यास त्याचे अनेक फायदे मिळतील. कोथिंबीरीचे पाणी पिणे आरोग्या( Health )साठी खूप फायदेशीर आहे. धणे हे एक सुपरफूड आहे ज्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात.
कोथिंबीरची पाने आणि बिया दोन्ही सर्वांसाठी फायदेशीर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहते. चला जाणून घेऊया त्याचे आणखी कोणते फायदे आहेत.
1. अॅसिडिटीमध्ये फायदेशीर
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी कोथिंबीरीचे/ धन्याचे पाणी प्यावे. कोथिंबीरीत असलेले गुणधर्म पोटाला थंड ठेवतात. अशा प्रकारे तुमची अॅसिडिटीची समस्या कमी होईल. कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने तुमच्या पोटात तयार होणार्या अॅसिडिटीची पातळी कमी होते आणि जळजळ कमी होत नाही. कोथिंबीरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर राहतात.
2. वजन कमी होते
कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी ही एक महत्त्वाची पेय आहे. कोथिंबिरीच्या बिया म्हणजेच ज्याला आपण धने म्हणतो त्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. याबरोबरच शरिरातील चरबी कमी करण्यासाठी देखील धन्याचे पेय महत्वाचे मानले जाते.
3. त्वचेसाठी फायदेशीर
कोथिंबिरीचे पाणी त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर होतात.
4. ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी
ज्यांना ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी कोथिंबिर उपयुक्त मानले जाते. ज्यांना रक्तदाबाचा त्रास असेल त्यांच्यासाठी कोथिंबिर किंवा धन्याचे पाणी महत्वाचे मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.