Home Remedies on Acidity Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies on Acidity: जेवणानंतर छातीत लगेच जळजळ होत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय

या घरगुती उपायाने छातीतील जळजळ काही क्षणात कमी होते.

दैनिक गोमन्तक

Home Remedies on Acidity: अनेक लोकांना जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर अचानक छातीत जळजळ सुरू होते. यामागे अनेक कारणे असू शकतात.

पण अनेकदा वेळेवर न जेवणं, जास्त खाणं, फास्टफुडचे अतिसेवन करणे आणि चुकीच्या सवयी यामुळे असा त्रास होतो. खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्याने देखील जळजळ होते.

त्यामुळे हार्ट बर्नची समस्या सुरू होते. छातीत जळजळ झाल्यामुळे अनेक वेळा लोक औषधांचे सेवन करतात. पण अशावेळी नेहमीच औषधे घेण्याची गरज नाही, तर काही घरगुती उपाय करून देखील हा त्रास कमी करता येतो.

  • घरगुती उपाय

छातीत तीव्र जळजळ होत असेल तर मिंट फ्लेवर्ड च्युइंगम चावून खावे. ते चघळल्याने जळजळ पूर्णपणे कमी होण्यास मदत मिळते. छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे.

यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या, त्यात एक चतुर्थांश बेकिंग सोडा टाका आणि मग ते मिक्स करून प्या. यामुळे 15 मिनिटांत आराम मिळेल. बेकिंग सोडा प्यायल्यानंतर अस्वस्थता, उलट्या आणि छातीत जळजळ होण्याची समस्या कमी होते. 

  • कॅमोमाइल चहा

छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही कॅमोमाइल चहा देखील पिऊ शकता. यामध्ये असलेले अनेक प्रकारचे गुणधर्म पोटासाठी खूप फायदेशीर असतात. जेवल्यानंतर प्यायल्यास तुम्हाला हा त्रास होणार नाही.

  • बदाम

बदामचे सेवन केल्याने तुमच्या छातीत होणारी जळजळ कमी होउ शकते.

  • थंड दुध

छातीत होणारी जळजळ कमी करायची असेल तर थंड दुध (Milk) प्यावे.

Home Remedies
  • आवळा कॅंडी

छातीत होणारी जळजळ कमी करायची असेल आवळा किंवा आवळा कॅंडीचे सेवन केले पाहिजे.

  • कोरफडचा रस

छातीत होणाऱ्या जळजळ लगेच कमी करायची असेल तर कोरफडीचा वापर करावा. ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. यामुळे तुमचे शरीर थंड राहते. छातीत जळजळ होण्याची समस्या असल्यास तुम्ही कोरफड रस पिऊ शकता.

  • सफरचंद

जर तुम्ही रोज सफरचंद खाल्ले तर तुमच्या पोटातील सर्व अॅसिड लगेच कमी होते. कारण अॅसिडमुळे छातीत जळजळ होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT