Height Increase Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Height Increase: लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

मुलांची उंची वाढत नसेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉरो करू शकता.

Puja Bonkile

Height Increase: कमी उंचीमुळे लोकांना खूप लाज वाटते. लहान मुलांची उंची वाढू न शकल्याने पालकही चिंतेत राहतात. जर तुमच्या मुलाची उंची वाढत नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमची उंची पटकन वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.

उंची वाढवण्यासाठी हे 5 पदार्थ खा


दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, चीज आणि पनीर, सर्व दुग्धजन्य पदार्थ उंची वाढवण्यासाठी चांगले मानले जातात. दुग्धजन्य पदार्थांपासून जीवनसत्त्वे मिळतात. ते कॅल्शियम देखील प्रदान करतात, जे मुलाच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

केळी


हा उंची वाढवण्यासाठी देखील चांगला आहार आहे. केळीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅंगनीज असते. यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप चांगले असतात. मुलाची उंची वाढत नसेल तर त्याला नक्कीच केळी खायला द्या.

हिरव्या पालेभाज्या


पालक, मेथी आणि बथुआ यासारख्या हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. यापासून शरीराला व्हिटॅमिन ए आणि सी मिळते. हे फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि लोहाचा देखील चांगला स्रोत आहे. हे खाल्ल्याने उंची झपाट्याने वाढते.

सोयाबीन


सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यात वनस्पती आधारित प्रथिने जास्त असतात. सोयाबीन हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. मुलाच्या विकासासाठी आणि उंची वाढण्यासाठी सोयाबीनचा आहारात समावेश करावा.

अंडी


प्रथिने आणि बायोटिनसह अनेक गुणधर्म असतात. मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. शारीरिक विकासासाठी हे खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करते आणि हाडांच्या वाढीस मदत करते ज्यामुळे उंची वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT