Heart Care| Running Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Care: हृदय विकार टाळण्यासाठी किती व्यायाम करावा? वाचा रिसर्च

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Heart Care: धावपळीच्या जीवणमानात अनेक लोकांना हृदया संबंधित आजार उद्भवतात. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि जीम करण्यावर भर देतो.

पण अनेक लोक नियमितपणे व्यायाम न करता वीकेंडला एकच दिवस व्यायाम करतात. पण असे करणे किती योग्य? तुम्हाला हृदयाच्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्यायाम करणे गरजेचे आहे का? फक्त एक दिवस व्यायम केल्याने हृदयाचे आजार दूर राहू शकतात. जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या संशोधनात काय समोर आले आहे.

संशोधनात आली ही माहिती समोर

एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, जामा जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. यामध्ये हृदय निरोगी करण्यासाठी एक्सरसाईज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अभ्यासात असो म्हटले आहे की, जर तुम्ही दररोज 40 मिनिटे व्यायाम करू शकत नसाल तर काही हरकत नाही. व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही वीकेंडमध्येही व्यायाम करत असाल ते निरोगी हृदयासाठी फायदेशीर आहे.

तुम्ही किती व्यायाम करता हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुम्ही आठवड्यातून किती दिवस व्यायाम करता आणि कोणत्या वेळी व्यायाम करता याचा हृदयाच्या आरोग्यावर काही फरक पडत नाही. शारीरिक हालचालींमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोलेस्टेरॉल यांचा धोका कमी करण्यास मदत मिळते.

  • तज्ञांचे मत पुढिल प्रमाणे

तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, रोज व्यायाम केला तरी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.तुम्ही जर नियमितपणे व्यायाम करू शकत नसाल तर आठवड्यातून एक दिवस व्यायाम केला तरी हृदय निरोगी राहते.

  •  पुढिल पदार्थांचे सेवन हृदयासाठी फायदेशीर

1. हिरव्या पालेभाज्या

तज्ञांच्या मते, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या जीवनसत्त्वे, नायट्रेट्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांच्या पेशी निरोगी होतात आणि बीपी नियंत्रित राहतो, ज्यामुळे आपले हृदय मजबूत होते.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हृदयरोगांशी लढते. निरोगी हृदयासाठी हिरव्या पालेभाज्यांच्या आपल्या आहारात समावेश करा.

2. सुका मेवा:

अक्रोड आणि बदाम यांसारखा सुका मेवा हृदयाला मजबूत करतात. ते फायबर आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहेत, जे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि पोटाची चरबी कमी करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. याच्या नियमित सेवनाने हृदय निरोगी राहते.

3. सोया प्रोटीन:

सोया प्रोटीन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उच्च फायबर आणि उच्च प्रथिने असलेले सोया प्रोटीन हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यामुळे हृदयविकार टाळण्यास मदत होते. सोया प्रोटीनमुळे हृदय मजबूत आणि निरोगी राहते. तसेच कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत होते.

4. ब्लूबेरी:

ब्लूबेरीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट मानले जातात. या स्वादिष्ट फळामध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी असते. त्याचा आहारात नियमित समावेश करून हृदय निरोगी आणि आजरांपासून दूर ठेवता येते.

5. संपूर्ण धान्य:

तांदूळ, ओट्स आणि बार्ली यांसारखे संपूर्ण धान्य हृदयाला मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यांच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, त्यामध्ये असलेल्या इतर पोषक तत्वांसह शरीर निरोगी होते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा आहारात समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT