heart attack risk low by pumpkin seeds helpful for diabetes patients and cholesterol will be reduced Dainik Gomantak
लाइफस्टाइल

भोपळ्याच्या बियांचे आहेत अनेक मोठे फायदे

भोपळ्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उपयुक्त

दैनिक गोमन्तक

भोपळ्याच्या बिया हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. भोपळ्याच्या बिया हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी फायदेशीर असतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. जर तुम्ही या बिया फेकत असाल तर आजच या बियांचा आहारात समावेश करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. भोपळ्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उपयुक्त आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय या बिया अनेक मोठ्या आजारांपासून दूर राहण्यासही हातभार लावतात. चला तर मग जाणून घेऊया याचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती आणि यापासून इतर कोणते फायदे मिळू शकतात.

रोज सेवन करावे

भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल वाढत नाही. हे तुमच्या शरीरातील वाईट आणि चांगले कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यास मदत करेल. साहजिकच त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होईल.

रक्तातील साखरही नियंत्रणात राहते

भोपळ्याच्या बिया मधुमेहाची समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. भोपळ्याच्या बियांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

शुक्राणूंची संख्या वाढेल

यासोबतच हे बीज शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला तुमच्या स्पर्म काउंटची समस्या असेल तर तुम्ही रोज भोपळ्याच्या बियांचे सेवन करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT