Heart Attack Prevention Tips: गेल्या काही वर्षात देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरुणांनाही या आजराने विळखा घातला आहे. हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली खूप महत्वाची असते. निरोगी सवयीच शरीर निरोगी ठेवतात. वैद्यकीय उपचार घेतानाही डॉक्टर सांगतात की, तुमचा आहार योग्य असणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहारामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. चला तर मग तज्ज्ञांकडून याबद्दल आणखी जाणून घेऊया...
हृदयविकार रोखण्यासाठी निरोगी आहाराच्या टिप्स
1. जंक फूड टाळा - औषध तज्ज्ञ करण कक्कर सांगतात की, हृदयविकार टाळण्यासाठी तुम्ही जंक फूड आणि मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे. मांसाहारी पदार्थ, विशेषतः प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
2. झोप - हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे, कारण झोप ही रोगप्रतिकारकशक्तीसाठी देखील आवश्यक आहे. पुरेशा झोपेमुळे खराब झालेल्या सेल्स रिपेयर होण्यास मदत होते. तसेच, हार्मोनल असंतुलनाची समस्या देखील झोपेमुळे कमी होते. यासाठी तुम्ही नियमितपणे 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे.
3. क्रोनिक स्ट्रेस आणि इमोशनल फिलिंग्सवर नियंत्रण ठेवा- क्रोनिक स्ट्रेस आणि इमोशनल फिलिंग्सवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. क्रोनिक स्ट्रेस आणि इमोशनल फिलिंग्सवरील नियंत्रणासाठी योगासने, ध्यानधारणा आणि प्राणायाम केले पाहिजेत.
4. व्हिटॅमिन बी-12- शरीरात व्हिटॅमिन बी-12 पुरेशा प्रमाणात असणे महत्वाचे आहे, कारण त्याच्या कमतरतेमुळे कोलेस्टेरॉलचे असंतुलन देखील होते. याव्यतिरिक्त, होमोसिस्टीन नावाच्या अमिनो आम्लाची पातळी कमी होते. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात व्हिटॅमिन बी-12 वाढते.
5. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स- तुम्ही तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत, कारण यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.