High Cholesterol Dainik Gomantak
लाइफस्टाइल

High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यास पायांमध्ये दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच व्हा सावध

शरीरातील कोलेस्टॉल वाढल्यास हृदयविकाराची समस्या वाढू शकते.यामुळे वेळीच सावध होउन काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

High Cholesterol: सध्या धावपळीच्या काळात अनेक आजार डोके वर काढत आहेत. दिवसेंदिवस हृदयविकाराच्या समस्या अधिक वाढल्या आहेत. शरिरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कोलेस्टेरॉल हा शरीरातील चरबी किंवा मेणासारखा पदार्थ आहे. जो शरीरातील पेशी, विशिष्ट हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आवश्यक असतो. परंतु जर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटरने वाढली तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास हृदयविकार आणि स्ट्रोक  यांसारख्या गंभीर आजारांच्या समस्या वाढू शकतात.

  • पाय थंड पडणे

हाय कॉलेस्टेरॉल (High Cholesterol) वाढण्याचे हे एक सामान्य लक्षण आहे. उच्च तापमानातही जर तुम्हाला थंडी वाजत असेल आणि पायात थरथर जाणवत असेल तर ते पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण असू शकते. अशी स्थिती तुम्हाला सुरुवातीला त्रास देणार नाही पण जर ती दीर्घकाळ राहिली तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • हाय कोलेस्टेरॉल कसे वाढते

हाय कॉलेस्ट्रॉलचे आरोग्यावर (Health) घातक परिणाम होतात. कारण ते लवकर लक्षात येत नाही. उच्च कॉलेस्टेरॉलची सुरुवातीची लक्षणे अतिशय सौम्य असतात. ज्यावर व्यक्ती जास्त लक्ष देऊ शकत नाही. 

यामुळे, शरीरात ते हळूहळू वाढू लागते आणि ज्या वेळेस ते आढळते, तोपर्यंत शरीराचे बरेच नुकसान झाले आहे. वेळीच काळजी घेतली आणि लक्ष दिले तर हाय कॉलेस्टेरॉलची समस्या दुर ठेवता येइल.

  • पायांच्या त्वचेच्या रंगात आणि आकारात बदल

शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होऊ लागतात. ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. 

जेव्हा काही भागांना रक्तपुरवठा कमी होतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या विशिष्ट अवयवाच्या एकूण कार्यावर आणि त्वचेच्या आकारावर होतो. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या पायांच्या त्वचेच्या रंगात आणि आकारात काही बदल दिसले आणि त्यामागे कोणतेही कारण सापडले नाही, तर हे उच्च कॉलेस्टेरॉलमुळे होत असल्याची शक्यता आहे. 

  • क्लॉडिकेशन

क्लॉडिकेशन हे रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे होणारे वेदना आहे. जे हाय कॉलेस्टेरॉलच्या सर्वात महत्वाच्या लक्षणांपैकी एक आहे.

या स्थितीमुळे पायांच्या स्नायूंमध्ये वेदना, पेटके आणि थकवा येतो. हे अनेकदा ठराविक अंतर चालल्यानंतर होते आणि काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर वेदनाही निघून जातात.क्लॉडिकेशनच्या वेदना बहुतेक पाय, मांड्या, नितंब, नितंब आणि पाय यांना जाणवतात. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT