Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Water Drinking Tips: भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तहान लागत असेल तर होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Water Drinking Tips: तुम्हालाही सारखी तहान लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Water Drinking Tips: पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टरही अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. जर एखाद्याला खूप तहान लागली असेल आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावे लागत असेल तर ही चांगली सवय नाही.

कारण हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही जास्त तहान लागत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

एनिमिया

शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. काही कारणाने अशक्तपणाची समस्या असल्यास वारंवार तहान लागते.

महिलांमध्ये जास्त रक्तस्त्राव आणि लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या उद्भवू शकते. खूप तहान लागण्याबरोबरच चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवत असेल तर ही अॅनिमियाची लक्षणे आहेत.

मधुमेह

उच्च रक्तातील साखरेमुळेही जास्त तहान लागते. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा शरीर ती लघवीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, अशावेळी खूप तहान लागते. वारंवार लघवी होत असेल आणि जास्त तहान लागली असेल तर मधुमेह होऊ शकतो.

पॉलीडिप्सिया

जास्त तहान लागल्याने ही समस्या उद्भवू शकते. जर वारंवार लघवी होत असेल तर द्रवपदार्थाची कमतरता भरून काढण्यासाठी शरीराला खूप तहान लागते. हे शारीरिक प्रक्रियेमुळे होते. जास्त लघवीमुळे तहान वाढते.

चिंता

अनेक वेळा अस्वस्थता आणि चिंता यामुळे तीव्र तहान लागते. तोंड कोरडे असले तरी खूप तहान लागते. जास्त घाम आल्याने तहान जास्त लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT