Mood Swing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mood Swing: मूड स्विंग्सचा फक्त इतरांनाच नाही तर स्वत:लाही होतोय त्रास, 'असे' मिळवा नियंत्रण

Mood Swing: तुम्हालाही मुड स्वींगचा त्रास होत असेल तर घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

healthy tips how to control mood swings

आजकाल मूड स्विंग होणे ही सामान्य समस्या झाली आहे. झोप न लागणे, अयोग्य आहार, खराब आरोग्य, धावपळ यासारख्या गोष्टी याला कारणीभूत ठरू शकतात. 

त्यामुळे एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो, कोणाशीही बोलावंसं वाटत नाही आणि छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण येऊ लागतो. मासिक पाळी, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये मूड स्विंग्स होते. 

ज्या व्यक्तीचा मूड क्षणोक्षणी बदलतो अशा व्यक्तीशी बोलण्यात लोक खूप संकोच करतात. या समस्येकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने मानसिक आरोग्यावर खूप वाईट होऊ शकतो. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

व्यायामाचे फायदे

नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरासोबत मनही निरोगी राहते. चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, जिमला जाणे, जे काही शक्य आहे ते तुमच्या दिनक्रमात समावेश करा. वर्कआऊट केल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे मन शांत राहते आणि मूड स्विंगची समस्या दूर होते. 

स्वतःच्या काळजी घ्यावी

अनेक वेळा तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते. परंतु तुम्ही व्यस्तता आणि जबाबदाऱ्यांमुळे स्वत:कडे दुर्लक्ष करत असाल तर यामुळे मूड बदलू शकतो. तुमच्या शरीराच्या गरजा समजून घ्या. जर तुम्हाला उत्साही वाटत नसेल तर जबरदस्तीने काम करू नका. तुमचे मन मोकळे करण्यासाठी, तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी वेळ द्यावे. 

सकारात्मक लोकांची संगत

यामध्ये तुमचे मित्र, कार्यालयातील सहकारी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा समावेश असू शकतो. अशा लोकांशी बोलण्यासाठी वेळ काढा जे तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवतात. तुम्हाला हसण्यास आणि आनंदी ठेवण्यास मदत करतात. यामुळे दुःख, चिंता आणि तणाव यासारख्या गोष्टींपासून मुक्त होणे सोपे होते. 

पुरेशी झोप

जर तुम्ही झोपताना मोबाईल आणि टीव्ही पाहत असाल, तर त्यामुळे मूड स्विंगची समस्या निर्माण होते. झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, डोकेदुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे लहानसहान गोष्टींवर राग येणे, कोणाशीही बोलणे न वाटणे यासारख्या समस्या दिसून येतात. त्याचबरोबर पूर्ण झोपेमुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोन वाढू लागतो. जे तुम्हाला निरोगी आणि आनंदी ठेवते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT