Ghee Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ghee Health Tips: देशी तुप खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल वाढू शकते का?जाणून घ्या सविस्तर

Ghee Health Tips: देशी तुप खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल वाढू शकते का हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Ghee Health Tips: देशी तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. भारतीय स्वयंपाकघरात देशी तूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अनेक लोक रोजच्या आहारात त्याचा विविध रूपात वापर करतात.

सकाळच्या नाश्त्यात देशी तुपासोबत पोळी किंवा पराठे खाऊ शकता. लोक भाज्या आणि भातासोबत देशी तूप देखील वापरतात. पण देशी तुपाच्या सेवनाने कॉलेस्ट्रॉल वाढते की नाही यावर मतभेद आहे.

अनेक लोकांचे असे मत आहे की देशी तुपात फॅटचे प्रमाण जास्त असते यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढू शकते. पण काही अभ्यासानुसार देशी तुपाचा कॉलेस्ट्रॉलवर खास प्रभाव पडत नाही असे मत आहे.

देशी तूप जास्त प्रमाणात खाणे

देशी तूप जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल वाढू शकते. देशी तूप सामान्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील एकूण कॉलेस्ट्रॉल आणि खराब एलडीएल कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयरोगा संबंधित आजार वाढू शकतात.

आधीच उच्च कॉलेस्ट्रॉल असेल तर....

ज्या लोकांचे कॉलेस्ट्रॉल आधीच जास्त आहे त्यांच्यावर देशी तुपाचा अधिक परिणाम होऊ शकतो. हाय कॉलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना आहार आणि औषधांद्वारे कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आवश्यक आहे. अशावेळी देशी तुपाचे जास्त सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

वयोवृद्ध लोक

जस जसे वय वाढते तसतसे कॉलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवणे अवघड होते. यामुळे तुपाचा प्रभाव जास्त असू शकतो. वयानुसार कॉलेस्ट्रॉल नियंत्रण कमकुवत होते. 60 वर्षांवरील लोकांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

देशी तुपात सॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढू शकते. देशी तूप जास्त प्रमाणात सेवन करणे वृद्धांसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे अशा लोकांनी तुप खाणे कमी करावे.

कॉलेस्ट्रॉल वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात

थकवा जाणवतो

उलट्या होतात

रक्तदाब वाढतो

छातीत दुखते

या गोष्टींपासून राहावे दूर

मीठ

साखर

मद्यपान

धूम्रपान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT