Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: पराठ्यांसोबत दही खाताय? मग वेळीच व्हा सावध

Healthy Food Tips: पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. तर दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्यास पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो.

Puja Bonkile

Healthy Food Tips: हिवाळ्यात पराठे खाण्याची मज्जाच वेगळी असते. हिवाळ्यात पराठे खायला सर्वांनाच आवडते. त्यात वेगळीच मजा आणि चव असते. थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा आवश्यक असल्याने पराठे खाणे फायदेशीर असते.

बटाटे, कांदे, चीज, पालक, मुळा आणि इतर गोष्टींपासून पराठे बनवले जातात. अनेक लोकांना दह्यासोबत पराठा खायला आवडतो. पण तज्ज्ञांमध्ये पराठ्यांसोबत दही खाणे टाळावे. कारण यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो.

दही आणि पराठा एकत्र का खाऊ नये

पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट मुबलक प्रमाणात असतात. तसेच दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यास पचनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे असे खाणे टाळावे. अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

पराठा आणि दही एकत्र खाण्याचे तोटे

  • पचनसंस्था

तज्ञांच्या मते पराठा आणि दही दोन्ही पचायला जड असतात. यामुळे नीट पचत नाहीत किंवा पचायला खूप वेळ लागतो.

जेव्हा दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केले जाते तेव्हा पचनक्रिया मंद होते. यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

  • त्वचेच्या समस्या

पराठा आणि दही दोन्ही आम्लयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही पदार्थांचे सेवन एकत्र केल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. दह्यासोबत पराठे खाल्ल्याने मुरुम येतात. यामुळे दह्यासोबत दही खाणे टाळावे.

  • वजन वाढणे

पराठा आणि दही या दोन्हीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ले की वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे तुमचा फिटनेस चांगला ठेवायचा असेल आणि वजन वाढवायचे नसेल तर दही आणि पराठे एकत्र खाऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT