Arjun Bark Benefits
Arjun Bark Benefits अोगलगक उदसोलूोक
लाइफस्टाइल

Arjun Bark Benefits: 'या' झाडाच्या सालीचे आहेत 6 चमत्कारी फायदे

Puja Bonkile

Arjun Bark Benefits: तुम्ही अनेकवेळा तुमच्या आजूबाजूला अर्जुनाचे झाड पाहिले असेल, पण तुम्हाला त्याचे फायदेशीर फायदे माहित आहेत का? या झाडाचे औषधी गुणधर्म फार कमी लोकांना माहिती आहेत. अर्जुन झाडाची साल हे आयुर्वेदिक औषध मानले जाते.

शतकानुशतके अनेक रोग बरे करण्यासाठी याचा वापर केला जातो. या सालीच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट आढळतो. म्हणूनच ते अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे इन्फेक्शन, घसा खवखवणे, सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या एका चिमूटभरात दूर करू शकते. चला तर मग जाणून घेऊया या जाडाची फायदे कोणती आहेत.

  • मधुमेह

अर्जुनच्या सालाचा उपयोग मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे काही विशेष एन्झाईम्स आणि अँटीडायबेटिक गुणधर्म मूत्रपिंड आणि यकृताचे आरोग्य निरोगी ठेवते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना अर्जुनच्या सालाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

  • हृदयरोग

अर्जुनची साल हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठी मदक करते. त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. एनसीबीआयने उंदरांवर आधारित केलेल्या संशोधनात असे आढळून आले की अर्जुनाच्या सालामध्ये ट्रायटरपेनॉइड नावाचे विशेष रसायन असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  • सर्दी आणि खोकला

ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास असतो त्यांनी अर्जुनच्या सालीचा दीर्घकाळ वापर करावा असा सल्ला दिला जातो.या सालाचे पाणी रक्तसंचयापासून आराम देते आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवून ते निरोगी बनवण्याचे काम करते.

  • श्वसनासंबंधातील आजार

आयुर्वेदात अर्जुनाच्या सालाचे पाणी श्वसनाच्या आजारांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. दम्यासारख्या श्‍वसनाच्या आजारांपासून आराम मिळवून देण्यासाठी याचा वापर केला जातो.

  • हाय ब्लड प्रेशर

अर्जुनच्या सालामध्ये ट्रायटरपेनॉइड रसायने आढळतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात हायपरटेन्सिव्ह गुणधर्म देखील आहेत, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

  • पचनसंस्ता सुरळित कार्य करते

पचनक्रिया सुधारायची असेल तर अर्जुनाच्या सालाचे पाणी प्यावे. हे बद्धकोष्ठता आणि गॅस्ट्रिक अल्सर सारख्या समस्या कमी करण्याचे काम करते. याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT