Healthy Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Relationship: लग्नाची सुपारी फोडण्याआधी मुला-मुलीच 'या' गोष्टींवर असावं एकमत, संसार होईल सुखाचा

लग्न करण्यापुर्वी मुला-मुलीने काही गोष्टींवर चर्चा करून एकमत होणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Healthy Relationship: कोणतंही नातं टिकून ठेवण्यासाठी दोन्ही लोकांना प्रयत्न करणं गरजेचं असतं. लग्न ही आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. लग्नाचा निर्णय घाईत कधीच घेऊ नये. लग्न जुळण्याआधी मुला-मुलीचे काही गोष्टींवर एकमत होणे गरजेचे आहे. अन्यथा संसार सुखात नांदणार नाही. तुम्हालाही संसार सुखाचा हवा असेल तर लग्नापुर्वी काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत.

मुल हवं कि नाही

लग्नाच्या वर्षभरानंतर लहान बाळ घरात येतो तेव्हा पूर्वीसारखी परिस्थिती राहत नाही. आजकाल जोडपी उघडपणे बोलतात की त्यांना लग्नाआधी मूल हवं का? जर होय, तर किती वर्षांनी?

तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराशीही याविषयी बोलले पाहिजे. जेणेकरून उद्या कौटुंबिक दबाव आला तर तुमच्या दोघांमध्ये या विषयावर भांडण होणार नाही. मुलांबाबत तुमच्यामध्ये जे काही ठरले असेल, गरज भासल्यास त्याबाबत दोन्ही कुटुंबांना माहिती दिल्यास तुमचा संसार सुखात नांदेल.

दोघांचे करिअर

अनेक नोकरी करणाऱ्या मुली लग्नानंतर नोकरी सोडतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलले पाहिजे की तुम्हाला दुसऱ्या शहरात किंवा देशात चांगली नोकरी मिळाली तर त्यालाही तुमच्यासोबत यायला आवडेल का? की दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात राहतील आणि काम करतील?

पालकांसोबत राहावे कि नाही

लग्नाआधी तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की तुम्ही दोन्ही पालकांसोबत राहणार आहात की एकटे. यामुळे तुम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या तयार व्हाल. लग्नानंतर तुम्ही आई-वडिलांसोबत राहत नसलात, तरी आई-वडिलांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी तुमची आहे का, यावरही चर्चा व्हायला हवी.

आर्थिक बाजू

कोणत्याही नात्यात पैशाबद्दल बोलणं चांगलं मानलं जात नाही. परंतु आजकाल बदलत्या आयुष्यात आणि वाढत्या गरजापाहून पैसा खूप महत्वाचा आहे. लग्नानंतर या विषयावर बोलून नात्यात कटुता निर्माण करण्यापेक्षा लग्नाआधी या विषयावर मनमोकळेपणाने आणि अर्थपूर्ण संवाद साधणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला संसाराचे आर्थिक बजेट लावण्यास मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT