Healthy Morning Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Morning Recipe: हेल्दी स्प्राउट्स खाऊन कंटाळा आला तर बनवा स्वादिष्ट थेपला

वजन कमी करण्यासाठी दररोज स्प्राउट्स खाण्याचा कंटाळा आलाय तर ट्राय करा हा पदार्थ

दैनिक गोमन्तक

Healthy Morning Recipe Sprouts Thepla: सकाळच्या नाश्त्यात स्प्राउट्स खाणे फायदेसीर असते. ते बॉडी स्लिम ट्रिम करण्यातही मदत करतात.

या कमी कॅलरी अन्नामध्ये भरपूर प्रथिने असतात. पण तुम्हाला रोज स्प्राउट्स खाण्याचा कंटाळा येत असेल तर आता स्प्राउट्स थेपले तयार करु शकता.

ते तयार करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत आणि ते काही वेळात तयार होईल. भिजवलेले हरभरे आणि मूग कोंब आल्यानंतर खाल्ले जातात.

त्यामुळे थोडे प्रयत्न करून त्याचे रूपांतर थेपले करता येते. चला तर मग जाणून घेऊया स्प्राउट्सपासून थेपले कसे बनवायचे.

  • स्प्राउट्सपासून थेपले बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- अंकुरलेले मूग आणि हरभरा

- दोन हिरव्या मिरच्या

- बारीक चिरून कोथिंबीर

- बारीक चिरलेली आले

- बारीक चिरलेले लसूण

- गव्हाचे पीठ

- चवीनुसार मीठ

- चिमूटभर हिंग

- हळद

- तेल

  • स्प्राउट्सचे थेपले बनवण्याची कृती

स्प्राउट्सचे थेपले बनवण्यासाठी प्रथम मूग आणि हरभरा रात्रभर भिजवा. नंतर त्यातील पाणी गाळून स्वच्छ कपड्यात दिवसभर लटकवावे. जेव्हा त्याला चांगले कोंब येतात तेव्हा ते खाण्यासाठी तयार होते.

या स्प्राउट्स मिक्सीच्या जारमध्ये बारीक करा. नंतर एका भांड्यात काढा. आता या बारीक केलेल्या स्प्राउट्समध्ये गव्हाचे पीठ घाला.

तसेच हळद, चवीनुसार मीठ घालावे. हिरवी मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट घाला. या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. आता फक्त या पिठाचा छोटा गोळा घेऊन पोळी लाटून घ्या.

तव्यावर चांगले सोनेरी होइपर्यंत भाजून घ्यावे. स्वादिष्ट स्प्राउट्सपासून बनवलेले थेपला तयार आहेत. त्यांना रायता, दही किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT