Healthy Diet For Pregnant woman Dainik Gomantak
लाइफस्टाइल

निरोगी गर्भधारण आणि आहार:यात काय संबंध ? नक्की वाचा

जीवसत्वे (Vitamins), कॅल्शियम (Calcium) , लोह (iron), प्रथिने (Protein) आणि फॉलिक अ‍ॅसिड (Folic acid) या घटकांची गरज असते.

दैनिक गोमन्तक

तुम्ही कधी असा विचार आहे का, की आहार आणि निरोगी गर्भधारण (Pregnancy) यात घनिष्ट संबंध आहे. प्रत्येक महिलेला (Women) असे वाटत असते की , तिला होणारे बाळ निरोगी (Healthy baby)आणि स्वस्थ असावे. महिलांनी या काळात आहारात (Diet) अनेक निरोगी सवयींचा समावेश करावा असे तज्ञांकडून सांगितल्या जाते. महिलांनी त्यांच्या गरोदरपणात (Pregnancy) सकस आणि पोषण आहार (Nutritious food) घेणे सर्वात महत्वाचे आहे. निरोगी गर्भधारणेकरीता फॉलिक अ‍ॅसिड (Folic acid) खूप गरजेचे आहे.

अनेक महिलांना गारोदरपणात कोणता आहार घ्यावा कोणता नाही ? असे प्रश्न पडतात. जीवसत्वे (Vitamins), कॅल्शियम (Calcium) , लोह (iron), प्रथिने (Protein) आणि फॉलिक अ‍ॅसिड (Folic acid) या घटकांची गरज असते. यामुळे शरीर आणि मेंदूमध्ये निरोगी पेशी तयार करण्यास मदत करते. फॉलिक अ‍ॅसिड याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. याकरिता महिलांनी आहारात फॉलिक अ‍ॅसिडचे सेवन करावे.

बी 9 जीवांसत्वाचे महत्व

बी 9 जीवांसत्व मेंदूतील द्रवपदार्थ , मज्जासंस्था यासाठी महत्वाचे मानले जाते. गर्भावती महिलांसाठी फॉलिक अ‍ॅसिड गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे गर्भाच्या स्पाइन बिफिडसारख्या जन्मजात विकृतीचा धोका कमी होतो. फॉलिक अ‍ॅसिड अनेक पदार्थातुन मिळते. फॉलिक अ‍ॅसिड पौष्टिक पदार्थांचे योग्य प्रकारे शोषण करण्याकरिता आणि शरीरात वाहून नेणाऱ्या रक्तपेशींसाठी महत्वाचे आहे. या घटकाच्या कमतरतेमुळे थकवा जाणवणे, भूक न लागणे, चिडचिडपना वाढणे , गर्भाचा अविकास असे इतर त्रास होतात.

या पदार्थांचे सेवन करावे -

मोड आलेले कडधान्ये - मोड आलेल्या कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असते. यामुळेच गर्भवती महिलांनी मोड आलेल्या कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

अंडी - अंड्याच आहारात सेवन करावे. कारण यात फॉलिक अ‍ॅसिडचे परमान असते. गर्भवती महिलांनी आपल्या आहारात याचा अवश्य समावेश करावा.

पालेभाज्या - गर्भवती महिलांनी या काळात पालेभाज्याचे सेवन अवश्य करावे. या भाज्या लोह , अॅंटीऑक्सिडेंट आणि फॉलिक अ‍ॅसिडने समृद्ध असतात. यात मेथी, पालक, ब्रोकोली ,शेपू , अशा भाज्यांचा समावेश करावा.

फळे - गर्भवती काळात महिलांनी फळाचे सेवन करणे चांगले असते. काही फळांमध्ये फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. यात खरबूज , केळी , पपई , पेरू, डाळिंब , खरबूज यासारखी फळे खावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT