Soybean Upma Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

सकाळी नाश्त्याला बनवा प्रोटिनयुक्त सोयाबीन उपमा, जाणून घ्या कृती

अनेकवेळा रव्याचा उपमा खाल्ला असेल, पण तुम्ही कधी सोयाबीनचा उपमा खाल्ला आहे का?

दैनिक गोमन्तक

तुमच्या दिवसाची सुरुवात सकस आहाराने व्हायला हवी, म्हणूनच तुमचा नाश्ता नेहमीच पोषक असायला हवा. आज आम्ही तुम्हाला सोयाबीन उपमा बनवण्याची हेल्दी रेसिपी सांगणार आहोत. सोयाबीनचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. सकाळी सकाळी पोषक आहार घेणाऱ्या लोकांसाठी सोयाबीन उपमा फायदेशीर आहे. याशिवाय सोयाबीनचे सेवन केल्याने व्यक्ती हृदयविकारापासून दूर राहते. (Soybean Upma Recipe)

साहित्य

  • 1 वाटी सोयाबीनचा किस

  • 1 टेस्पून भाजलेले शेंगदाणे

  • 1/2 टीस्पून मोहरी

  • 1 टीस्पून कढीपत्ता

  • 1 अख्खी लाल मिरची

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार तेल

सोयाबीन उपमा बनवायची कृती(Soybean Upma Recipe)

प्रथम एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घाला. या सर्व गोष्टींना तडका बसू द्या. मोहरी तडतडल्यावर त्याच मीठ घाला. सोयाबीनचा किस आणि भाजलेले शेंगदाणे घालून थोडं मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर वरून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून झाकण ठेवून 4-5 मिनिटे शिजवा.त्यानंतर गॅस बंद करा.सोयाबीन उपमा तयार आहे. हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि आपल्या घरातील सदस्यांना सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT