Healthy Heart: निरोगी ह्रदयसाठी ओट्सचा लाभदायी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Heart: निरोगी ह्रदयासाठी ओट्स लाभदायी

निरोगी हृदयासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

अनेकांना लोकांना हृदय विकार असतात. आपल्या ह्रदयाची काळजी घेणे आपल्या हातात आहे. यासाठी आपण आहारात पोषक घटकांचा समावेश करायला पाहिजे. यामुळे आपल्या ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते. यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा जाणून घेवूया.

* ओट्स

ओट्स अनेकांचा आवडता नाश्ता आहे. यामुळे ह्रदय निरोगी राहण्यास मदत मिळते. ओट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करते. शिवाय ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा लाभदायी ठरते.

* सुकामेवा

निरोगी हृदयासाठी आपण सुकामेवा नियमितपणे खायला पाहिजे. यात अक्रोड, बदाम, काजू यांचा समावेश करावा. यात फॅटचे प्रमाण अधिक असते. जे आपल्या शरीरसाठी उपयुक्त ठरते. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करते आणि हृदय विकाराना दूर ठेवते.

* मसाले

आपल्या स्वयंपाक घरात मसाले असतात. यात हळद, धणे,जिरे आणि दालचीनीचा समावेश करावा. यामुळे ह्रदय विकार होण्याचा धोका कमी होतो.

* लसूण

लसूण आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. ज्या लोकांना हृदय विकार असतात त्यांनी लसूणचे सेवन करावे. लसूण पेस्टचा अधिक वापर भाजीमध्ये केला जातो. पण रिकाम्या पोती लसूण खाल्यास अधिक फायदेशीर ठरते. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.

* पालक

पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. पालकमद्धे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. तसेच हृदयाचे विकार होण्यापासून बचाव होतो.

टीप: पालक जास्त वेळ शिजवू नये. कारण टयातील पोषक घटक कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT